छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की वातावरण सर्वत्र थंड असतं आणि अतिशय आल्हाददायक असं वातावरण वाटतं. पण जशी जशी थंडी वाढत जाते तसे अनेक आजार देखील उद्भवत जातात. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पण सर्वात जास्त काळजी घ्यावी ती म्हणजे ज्यांना हृदयविकार आहे अशा लोकांनी. तर हृदयविकार असणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी? याविषयीच आपल्याला हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी कशी घ्यावी काळजी?
ज्या लोकांना हृदयविकाराचा धोका आहे अशा व्यक्तींनी स्वतःला जपावं. त्यासोबतच वातावरण बदल होतो. तर त्यांनी वातावरणाशी जळून घेण्याचा प्रयत्न करावा. कारण की थंडी वाढल्यामुळे अनेक असे आजार देखील वाढतात. ज्यांना हृदयविकार आहे त्यांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून आपली तपासणी करून घ्यावी. तसेच जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही तुमचा मधुमेह देखील नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. मधुमेह आणि हृदयविकार असेल तर तुम्ही अतिशय काळजी घ्यावी.
पराभवाने डोकं जड झालंय का? तुम्हाला हा गंभीर आजार, कसं बाहेर पडायचं? डॉक्टरांनी दिला सल्ला
ज्यांना हृदयविकार आहे अशा सर्वांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. त्यासोबत तुम्ही उपदार कपडे देखील वापरावे. स्वेटर सॉक्स याचा देखील वापर करावा. तसेच धूम्रपान करू नये. त्यासोबतच तुम्ही जे थंडपेय आहेत ते घेऊ नये. ज्यामध्ये कोल्ड्रिंकचा समावेश होतो. तुम्ही हे थंड पेय घेऊ नये. त्याचबरोबर तुमचा आहार चांगला आसवा. तुमच्या आहारामध्ये सर्व गोष्टींचा समावेश तुम्ही करणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही योगासने आणि प्राणायाम हे नियमितपणे करावे. जेणेकरून तुमचा हृदय चांगलं राहील आणि याचा तुम्हाला फायदा होईल.
अशा पद्धतीने जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली. तर या हिवाळ्यामध्ये तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी होईल आणि तुमचं हृदय हे चांगले राहीलच. पण त्यासोबत तुमचे आरोग्य देखील चांगले राहील, असं डॉक्टर गणेश सपकाळ सांगतात.





