युरिक अॅसिड वाढल्यानं सांधेदुखी, स्नायूंचा कडकपणा आणि सूज यासारख्या समस्या उन्हाळ्यात आणखी वेदनादायी होतात. वाढलेल्या युरिक अॅसिडमुळे या समस्या वाढतात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय केले जाऊ शकतात. शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैली.
Summer : समर फेस पॅक वापरा, उन्हाळ्यात दही, बेसन, हळद, मधानं मिळेल गारवा
advertisement
युरिक अॅसिड कमी करण्यासाठी घरगुती उपाय -
1. भरपूर पाणी प्या -
उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. पुरेसं पाणी प्यायलात तर शरीरातील युरिक अॅसिड बाहेर पडण्यास मदत होते आणि सांधेदुखी आणि सूज कमी होते. दिवसभरात कमीत कमी 8-10 ग्लास पाणी प्या. नारळ पाणी आणि लिंबू पाणी हे पर्यायही आहेत.
2. योग्य आहार घ्या -
युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी, प्युरीनयुक्त पदार्थांचं प्रमाण कमी असलेले आहार घ्या. लाल मांस, समुद्री खाद्य आणि अल्कोहोल टाळा. फळं, भाज्या, धान्य यांसारखे फायबरयुक्त आहार घ्या. काकडी, टरबूज, संत्री आणि पपई यांसारखी ज्यात पाण्याचं प्रमाण अधिक आहे अशी फळं उन्हाळ्यात युरिक अॅसिड नियंत्रित करण्यास मदत करतात.
3. नियमित व्यायाम करा -
युरिक अॅसिड नियंत्रित करण्यात शारीरिक हालचालींची भूमिका महत्त्वाची असते. नियमित व्यायाम केल्यानं शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज कमी होते. यासाठी दिनचर्येत योगा, पोहणं आणि मॉर्निंग वॉकचा समावेश करा.
Summer Care : कडक उन्हाळा आणि गारेगार काकडी, उन्हाळा होईल सुसह्य, डोळे, केसांसाठीही फायदेशीर
4. हर्बल उपचार -
काही नैसर्गिक औषधी वनस्पती युरिक अॅसिड कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. आलं आणि हळद यांसारखे दाहक-विरोधी गुणधर्म असलेले घटक वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. हळदीचं दूध किंवा आल्याचा चहा प्या.
5. संतुलित जीवनशैली
ताणतणाव आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते. पुरेशी झोप घेऊन, ताण कमी करण्यासाठी उपाय करणं, आणि वेळेवर जेवण यामुळे युरिक अॅसिड नियंत्रित करता येतं. ताण कमी करण्यासाठी ध्यान आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम करणंही उपयुक्त ठरतं.
उन्हाळ्यात युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी योग्य आहार, पुरेसं पाणी, शारीरिक हालचाल आणि नैसर्गिक उपाय या टिप्स लक्षात ठेवा. या सवयींमुळे युरिक अॅसिडची पातळी नियंत्रित राहील तसंच सांध्यांना येणारी सूज, वेदना यापासूनही आराम मिळेल.