TRENDING:

Vitamin B12 : व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष नको, प्रकृतीवर होतील परिणाम, हे उपाय ठरतील फायदेशीर

Last Updated:

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष केल्यानं प्रकृतीवर परिणाम होतात. त्यामुळे वेळीच औषधं आणि आहारात आवश्यक बदल करणं गरजेचं आहे. दुधात खजूर मिसळून खाल्ल्यानं शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची पातळी वाढू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

व्हिटॅमिन बी 12 याला कोबालामिन देखील म्हणतात. हे व्हिटॅमिन मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि विकासासाठी खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन बी 12 शरीरातील लाल रक्तपेशी तसेच डीएनए आणि न्यूरॉन्सच्या निर्मितीमध्ये ही देखील मदत करतं. त्यामुळे त्याचा पुरेसं प्रमाण शरीरासाठी आवश्यक आहे. पण शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते तेव्हा शरीराच्या कार्यावर आणि ऊर्जेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्हिटॅमिन बी 12 युक्त आहार घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात.

advertisement

Tea Powder : चहा पत्तीपासून बनवा फेस स्क्रब, डेड स्किन काढण्यासाठी उपयुक्त

व्हिटॅमिन बी 12 पूरक आहार घेण्यासाठी दूध आणि ड्राय फ्रुट्सही खाऊ शकता. दुधात खजूर मिसळून खाल्ल्यानं शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची पातळी वाढू शकते.

advertisement

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं

शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर थकवा, अशक्तपणा जाणवतो. हात आणि पायांना मुंग्या येतात. भूक कमी होते. चेहऱ्यावर सूज येऊ लागते. थोडेसे काम केल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. जिभेत वेदना होऊ लागतात. त्वचा सैल आणि कमकुवत झाल्यामुळे त्यावर पिवळसरपणा दिसू लागतो. रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात. वजन अचानक कमी होतं. स्मरणशक्ती कमी होते आणि स्वभाव चिडचिडा होतो. याशिवाय डोकेदुखी, हृदयाचे ठोके जलद होणं आणि अंधुक दिसणे ही देखील शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणं आहेत.

advertisement

व्हिटॅमिन बी 12 साठी दुधासह खजूर खाण्याचे फायदे -

दुधामध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात आढळतं.

खजूर मिसळून दूध प्यायल्यास शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची पातळी लवकर वाढेल.

दुधासोबत खजूर नियमित प्यायल्यानं व्हिटॅमिन बी12 ची कमतरता दूर होते.

दुधासोबत खजूर खाल्ल्यानं पचनशक्तीही मजबूत होते.

Skin Care Routine : उन्हापासून करा चेहऱ्याचं रक्षण, त्वचेचं आरोग्य जपण्यासाठीच्या सोप्या टिप्स

advertisement

खजुरामध्ये व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात नसतं, पण त्यातले इतर पोषक घटक उपयुक्त असतात, त्यामुळे दुधासोबत खजूर खाणं शरीराला फायदेशीर आहे. खजुरामध्ये भरपूर फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह असतं. शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता खजूर पूर्ण करू शकत नाही, पण दूध आणि दह्यासोबत खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा देण्यासोबतच प्रकृतीसाठी हे खूप उपयुक्त आहे.

मधुमेह असेल तर खजूर खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin B12 : व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष नको, प्रकृतीवर होतील परिणाम, हे उपाय ठरतील फायदेशीर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल