कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. रात्रभर झोपल्यानंतर शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी कोमट पाणी पिल्याने पचनसंस्थेला चालना मिळते आणि शरीरातील टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर फेकले जातात. यामुळे त्वचा चमकदार राहते आणि अनेकदा पिंपल्ससारख्या समस्या दूर होतात.
Monsoon Tips: पावसाळ्यात ओलसर कपडे वापरताय? आताच थांबा, होऊ शकतो या आजाराचा धोका
advertisement
या सवयीचा दुसरा मोठा फायदा म्हणजे वजन कमी होण्यास होणारी मदत. कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा मध घालून घेतल्यास शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही सवय अत्यंत उपयुक्त ठरते.
तसेच कोमट पाणी पिण्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. सकाळी पोट साफ न होणे ही अनेकांची सामान्य समस्या असते. कोमट पाणी पचनसंस्थेला उष्णता देऊन आतड्यांची हालचाल सुरळीत करते आणि नैसर्गिकरीत्या पोट साफ होते. परिणामी गॅस, अपचन आणि अॅसिडिटी सारख्या त्रासांपासून सुटका मिळते.
शेवटी ही सवय हळूहळू शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि इम्युनिटी बळकट करते. यामुळे लहानसहान आजारांपासून संरक्षण मिळते. थोडक्यात दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे ही सवय दीर्घकाळ आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत लाभदायक आहे. त्यामुळे ही सवय आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच समाविष्ट करावी.