Monsoon Tips: पावसाळ्यात ओलसर कपडे वापरताय? आताच थांबा, होऊ शकतो या आजाराचा धोका

Last Updated:

Monsoon Tips: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे वाळत नाहीत. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात.

+
News18

News18

अमरावती: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे वाळत नाहीत. वाळले तरी ते ओलसरच असतात. कपडे अंगात घातल्यानंतर वाळतील हा विचार करून आपण ओलसर कपडे घालतो. त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. सतत ओलसर कपडे घालण्यात आले तर अंगाला खाज सुटते. त्यानंतर आणखी त्रास वाढतो. त्याचबरोबर अनेकदा आपण पावसात भिजतो आणि ओले कपडे लवकर शरीराच्या वेगळे करत नाहीत. त्यामुळेही त्वचेच्या समस्या वाढतात. या सर्व समस्या होऊ नये, म्हणून कोणत्या उपाययोजना कराव्यात? याबाबत माहिती डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
ओलसर कपडे वापरल्यास कोणकोणत्या समस्या निर्माण होतात?
याबाबत माहिती देताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, अनेक वेळा आपण ओलसर कपडे अंगात घालतो. आपल्याला वाटतं की, अंगात घातल्यानंतर कपडे सुकतात. पण, ओलसर कपडे वापरल्यास आपल्या शरीरावर अनेक आजार निर्माण होतात. त्यामुळे फंगल इन्फेक्शनचा धोका जास्त असतो. फंगल इन्फेक्शन एकदा झालं की, ते वाढत जाते. त्याला आळा घालण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्याबरोबर त्वचेवर बारीक सुद्धा येऊ लागतात. तर या सर्व समस्या टाळण्यासाठी काही उपाययोजना तुम्ही करू शकता
advertisement
कोणत्या उपाययोजना करू शकता? 
ओलसर कपडे असल्यास त्यावर गरम प्रेस फिरवून नंतर ते कपडे वापरा. जास्त ओले कपडे असल्यास ते वापरणे टाळा. पावसात भिजले असल्यास लगेच ते ओले कपडे काढून एखाद्या अँटीसेप्टिक साबणाने अंघोळ करा. कपड्यांवर पांढरी परत आढळली असेल तर ते कपडे स्वच्छ केल्याशिवाय वापरू नका. आपले शरीर कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा, असे डॉक्टरांनी सांगितले. शरीराच्या मोड आलेल्या भागात फंगल इन्फेक्शन जास्त प्रमाणात होऊ शकतं. काही वेळा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्याची खूप जास्त वाढ होते आणि त्यावर ट्रीटमेंट करणे कठीण जाते. त्यामुळे काही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Tips: पावसाळ्यात ओलसर कपडे वापरताय? आताच थांबा, होऊ शकतो या आजाराचा धोका
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement