आरओचे पाणी पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण त्या पाण्यात टीडीएसचे प्रमाण 50 पेक्षा कमी असेल, तर तुमचे हाडे ठिसूळ होऊ शकतात. सांध्यामध्ये त्रास होऊ शकतो. एवढेच नव्हे तर अति जास्त टीडीएसचे पाणी प्यायल्यास हृदयावर परिणामही होऊ शकतो, मूतखडाही होऊ शकतो, असं डॉ. आदित्य येळीकर यांनी सांगितलं.
advertisement
भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं? फाॅलो करा 'या' सोप्या टिप्स, 5 मिनिटांत कळेल खरं-खोटं...
आरओचे पाणी पितांनी आपल्याकडील आरओच्या पाण्याची टीडीएस उपकरणाने तपासणी करत गरजेचे आहे. आरओ केंद्राच्या मालकाला पाण्यातील टीडीएसचे प्रमाण 50 ते 150 मि.ग्रॅ./लि. ठेवण्यास सांगा. 50 पेक्षा कमी आणि 150 पेक्षा जास्त टीडीएस असलेले पाणी आरोग्यासाठी हितकारक नाही, असं डॉ. आदित्य येळीकर यांनी सांगितलं.
ज्या पाण्यामध्ये सर्व घटक असतील असेच पाणी प्यायला पाहिजे. कारण की त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही किंवा कुठलेही वाईट परिणाम हे आपल्या शरीरावरती होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही पाणी पिताना ते पाणी चांगलं आहे का किंवा त्यामध्ये किती टीडीएस आहे हे बघूनच ते पाणी प्यावं, असंही डॉ. आदित्य येळीकर यांनी सांगितलं.





