छत्रपती संभाजीनगर : अनेक जण हे उन्हाळ्यात चेहऱ्याची तसेच त्वचेची विशेष काळजी घेतात. अनेक जण दररोज स्किन केअर करत असतात. त्याचाच एक भाग म्हणजे सनस्क्रीन लावणे. उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करतात. पण आपल्या स्किन टाईपनुसार किंवा कोणत्या एसपीएफ असलेलं सनस्क्रीन वापरावे, याविषयी माहिती नसते. याविषयीच त्वचारोग तज्ज्ञ डॉ. सुनिता शेळके यांनी माहिती दिली आहे.
advertisement
उन्हाळा सुरू झाला की आपण आपलं स्किन केअर करणं हे अत्यंत गरजेचं असतं. विशेष म्हणजे या उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या घातक किरण्यापासून आपल्या संरक्षण करण्यासाठी आपण सनस्क्रीन लावणं हे अत्यंत गरजेचे असतं. दोन प्रकारचे सनस्क्रीन हे असतात. एक म्हणजे केमिकल युक्त आणि दुसरं म्हणजे फिजिकल सनस्क्रीन हे असतात. पण प्रत्येक व्यक्तीचा स्किन टोन आणि स्किन टाईप हा वेगळा असतो, असं डॉ. सुनिता शेळके सांगतात.
Healthy Summer Fruits: उन्हाळ्यात ही 5 फळे खाल, तर दवाखान्याच्या खर्चापासून लांब राहाल!
त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यासाठी वेगळ्या प्रकारची किंवा वेगळं एसपीएफ असणारी सनस्क्रीन असते. सगळ्यात पहिले म्हणजे सनस्क्रीन ही तुम्ही घराच्या बाहेर निघण्या अगोदर 20 मिनिटे किंवा 30 मिनिटे लावणं गरजेचं आहे. ते याकरिता की ती चांगल्या प्रकारे आपल्या त्वचेमध्ये जाणं गरजेचं आहे जेणेकरून सूर्याच्या हानिकारक किरण्यापासून आपल्या त्वचेचं रक्षण होईल. जर कोणाची स्किन ही ऑइली असेल तर त्यांनी जेल बेस सनस्क्रीन ही वापरावी. कारण की ती त्या स्किनसाठी योग्य असते.
तसेच उन्हाळ्यामध्ये तुम्ही एसपीएफ 50 जास्त सनस्क्रीनमध्ये असेल. तसंच त्यांची कॉम्बिनेशन स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल तर त्यांनी क्रीम बेस असलेल्या सनस्क्रीन वापरावा. अशा पद्धतीने तुम्ही हे लावू शकता. पण लावताना सांगितल्याप्रमाणे लावावा आणि योग्य ती काळजी घ्यावी, असंही डॉ. सुनिता शेळके यांनी सांगितलं.





