अमरावती: हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे केसातील कोंडा. केसातील कोंडा वाढला की डोक्याला खाज सुटणे, कपाळावर पुरळ येणे, चेहऱ्याला खाज येणे, अशा समस्या वाढतात. त्यातच खाजवताना हाताला कोंड्याचे बारीक कण लागतात आणि इन्फेक्शन होते. त्यामुळे केसातील कोंडा कमी करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात केसातील कोंडा टाळण्यासाठी काय उपाय करावेत? याबाबत अमरावती येथील त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे केसातील कोंडा जास्त वाढतो. त्याचबरोबर आपल्या काही बारीक सारीक चुकांमुळे त्याचे फंगल इन्फेक्शन होते. त्यामुळे योग्य ती काळजी घेण्याची गरज असते.
चविष्ट अन् पौष्टिक, हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप, पाहा संपूर्ण रेसिपी VIDEO
या गोष्टी टाळल्याच पाहिजे
- केसांत वारंवार हात घालणे टाळावे.
- नखानी कोंडा काढून तेच हात इतर ठिकाणी लावणे सुद्धा टाळावे.
- घरगुती उपाय करणे टाळले पाहिजे. (कोरफड, दही, लिंबू, अंडी इ.)
- केस खूप ड्राय झाले असतील तर तेल लावायचे असल्यास केस धुण्याच्या अर्धा तास आधी लावावे.
- तेल गरम करून लावू नये. केसांना तेल लावणे बंद केले तरी चालेल.
ना शस्त्रक्रिया ना त्रास, पाठीचं दुःखणं एकदम 'खल्लास'; 'हे' घरगुती उपाय करुन पाहा, फरक नक्की पडेल
केसातील कोंडा घालवण्यासाठी काय करावे?
- आपल्या केसांना सूट होईल असा अँटी डेंड्रफ शाम्पू वापरायचा.
- आपल्या केसांच्या टाईप नुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने शाम्पू वापरा.
- आपण वापरत असलेला कंगवा आठवड्यातून दोनदा गरम पाण्याने धुणे गरजेचे आहे.
- स्वतःचा स्पेशल कंगवा असेल तरीही तो धुवून घ्या, त्यामुळे पुन्हा इन्फेक्शन होणार नाही.
- आपण वापरत असलेली उशी सुद्धा नेहमी उन्हात वाळवून घ्यावी.
“काय करावं यापेक्षा काय करू नये, याकडे लक्ष दिले तर तुमच्या केसातील कोंडा कमी होण्यास नक्की मदत होईल. त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने एखादा शाम्पू वापरणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे केसातील कोंडा कमी होऊन चेहऱ्यावरील पुरळ कमी होतात. कोंडा हा चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी सुद्धा कारणीभूत असतो, असेही डॉ. टाकरखेडे यांनी सांगितले.





