ना शस्त्रक्रिया ना त्रास, पाठीचं दुःखणं एकदम 'खल्लास'; 'हे' घरगुती उपाय करुन पाहा, फरक नक्की पडेल
- Published by:Devika Shinde
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
थंडीचा हंगाम सुरू होताच सांध्याव्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीला स्नायूंमध्ये तीव्र वेदनांचा सामना करावा लागतो. खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विकारांमुळे हे अनेकदा घडते. परंतु थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात वेदना वाढण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : थंडीच्या दिवसांमध्ये सांधेदुखी, स्नायू कडक होणे आणि वेदनांमध्ये वाढ होते. खराब जीवनशैली, तळकट पदार्थांचे सेवन, आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे या समस्या बळावतात. थंड हवामानात बॅरोमेट्रिक दाब वाढतो, ज्यामुळे हाडे आणि मज्जातंतूंवर दाब येतो. त्यामुळे वेदना अधिक तीव्र होतात.
योगवैद्य अभिषेक जुन्नरकर यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले की योग्य दिनचर्या, आहार, व्यायाम, आणि गरम पाण्याचा शेक घेतल्याने या समस्यांवर उपाय करता येतो.
advertisement
थंडीत स्नायू आणि सांधेदुखी वाढण्याची कारणे
- थंड हवामानाचा परिणाम: थंडीत रक्ताभिसरण मंद होते, त्यामुळे स्नायूंमध्ये कडकपणा येतो.
- स्नायू आकुंचन: थंडीमुळे स्नायू आकुंचन होतात, ज्यामुळे वेदना वाढतात.
- जास्त वजन: हिवाळ्यात तळकट पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते, आणि त्यामुळे सांधेदुखीची समस्या होते.
उपाय: स्नायू आणि सांधेदुखी कशी टाळाल?
- आहार नियंत्रण:
- हिरव्या भाज्या, फळे, आणि कमी चरबीयुक्त पदार्थ खा.
- प्युरिन तयार करणारे पदार्थ टाळा, जसे मिठाई, ग्लुटेनयुक्त पदार्थ, तळकट पदार्थ.
- रोज कोमट पाणी प्या, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
advertisement
- दररोज सकाळी स्ट्रेचिंग किंवा व्यायाम करा.
- यामुळे स्नायूंची हालचाल सुधारते आणि वेदना कमी होतात.
- हिटींग पॅड किंवा गरम पाण्याच्या बॉटलने दुखऱ्या भागावर शेक द्या.
- रबरी पिशवीसुद्धा वापरू शकता.
- आरामदायक लोकरीचे कपडे परिधान करा.
- अती टाईट कपडे टाळा.
वैद्यकीय सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या
advertisement
जर वेदना अधिक असतील, तर नाशिक येथे योगवैद्य अभिषेक जुन्नरकर यांच्याकडे सल्ला घेता येईल. चेतनगर, पाथर्डी फाटा येथील त्यांच्या क्लिनिकमध्ये ते योग्य मार्गदर्शन देतात.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
December 05, 2024 10:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ना शस्त्रक्रिया ना त्रास, पाठीचं दुःखणं एकदम 'खल्लास'; 'हे' घरगुती उपाय करुन पाहा, फरक नक्की पडेल

