TRENDING:

health tips : उन्हाळ्यात होतोय घामोळ्यांचा त्रास, तर आताच करा हा उपाय, लगेच मिळेल आराम..

Last Updated:

सर्वात आधी लहान मुलांना मसालेदार कुरकुरे चिप्स खायला देऊ नये. कारण यामध्ये त्वचेला अॅलर्जी होईल, असे तत्त्व आढळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हिना आजमी, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

डेहराडून : सध्या सर्वांना प्रचंड उकाड्याचा त्रास होत आहे. अशा परिस्थिीत उन्हाळ्यात लहान मुलांच्या त्वचेवर घामोळ्या पाहायला मिळतात. त्यामुळे तुमच्याही मुलांना, किंवा तुम्हालाही जर घामोळ्यांचा त्रास होत असेल तर, ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही काही प्रकारचे उपाय करुन हा त्रास कमी करू शकतात.

सर्वात आधी लहान मुलांना मसालेदार कुरकुरे चिप्स खायला देऊ नये. कारण यामध्ये त्वचेला अॅलर्जी होईल, असे तत्त्व आढळतात. याशिवाय तुम्ही कडुलिंबाची काही पाने, काळ्याभोर बिया आणि कारल्याचे छोटे तुकडे करून अर्धा तास शिजवून घ्या आणि नंतर अर्धा चमचा पाण्यात मिसळून मुलाला द्या. यासोबतच याबाबत उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथील आयुर्वेदिक डॉक्टर सिराज सिद्दीकी यांनीही महत्त्वाची माहिती दिली.

advertisement

inspiring story : शेतकऱ्याच्या पोरीची कमाल, मोबाईलपासून दूर, शेतात टॉर्च लावून अभ्यास, आता मिळवलं मोठं यश

लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, घामोळ्यांना Prickly heat असेही म्हटले जाते. उन्हाळ्यात अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो. याचे एक प्रमुख कारण डिहायड्रेशन असे आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे, विषारी पदार्थ वाढतात आणि ते बाहेर पडू लागतात. त्यामुळे खूप खाजही येते. कधी कधी त्या घामोळ्यांना खाजलं त्यातून रक्तही निघते.

advertisement

काही लोकांना हिवाळ्यातही तो त्रास होतो. तापमान बदलल्याने शरीर ते अॅडजस्ट करू शकत नाही आणि त्यामुळे हा त्रास होतो. तर काही लोकांना औषधींचाही साइड इफेक्ट होतो. काही फूडमध्ये अॅलर्जी होते, यामुळेही हा त्रास होतो. तसेच जास्त मीठ, मिरची खाणाऱ्यांनाही हा त्रास होतो. त्यामुळे मसालेदार भोजन करू नका आणि आपल्या मुलांनाही अशाप्रकारचे भोजन देऊ नका.

advertisement

तरुणपणीच होतायेत म्हातारपणीचे आजार, तरुणा-तरुणींना सर्वात मोठा फटका, नेमकं काय कराल?

डॉ. सिराज सिद्दीकी यांनी सांगितले की, कारल्यामध्ये अँटिबायोटिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म भरपूर असतात, तर कडुनिंबाच्या पानांमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे घामोळ्यांपासून सुटका होण्यासाठी आधी कारल्याचे लहान तुकडे करा आणि नंतर काही जांभळाच्या बिया आणि काही कडुलिंबाची पाने धुवून अर्धा तास पाण्यात उकळून घ्या. यानंतर अर्धा चमचा हे द्रावण अर्धा कप पाण्यात मिसळून मुलांना द्या. तसेच दिवसातून दोन ते तीन वेळा हे घेतल्यास काही दिवसातच या समस्येपासून आराम मिळेल.

advertisement

सूचना : वर दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. कोणतेही औषधी वगैरे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
health tips : उन्हाळ्यात होतोय घामोळ्यांचा त्रास, तर आताच करा हा उपाय, लगेच मिळेल आराम..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल