अमेठी : सध्या जीवनशैली बदलल्याने अनेकांना या बदलत्या जीवनशैलीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. आधी जे आजार वृद्ध व्यक्तींना होत होते, तेच आता तरुणाईला होत असल्याचे दिसत आहे आणि या आजारांमुळे तरुणाईला त्रास होत आहे.
तरुणाईला गुडघे दुखीचा त्रास आणि इतर आजारांच्या समस्या जास्त होत आहे. तरुणाई थकवा, निद्रानाश आदी आजारांना बळी पडत आहे. अनेक तरुणांमध्ये अशा प्रकारच्या समस्या पाहायला मिळत आहेत. तसेच ओपीडीमध्येही तरुण उपचारासाठी पोहोचत आहेत.
advertisement
सध्याच्या काळात योग्य खानपान नसणे आणि जंक फूडचा वापर जास्त करणे यामुळे तरुणाईला अशा प्रकारच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. आधी हा आजार वृद्ध आणि जास्त वयाच्या पुरुष आणि महिलांना पाहायला मिळायचा. मात्र, आता हा आजार तरुणाईमध्येही पाहायला मिळत आहे.
तरुणांना गुडघेदुखीचा त्रास होत आहे. तसेच त्यांना थकवाही जाणवत आहे. यामुळे तरुण तणावात आहेत आणि त्यांना त्रास होत आहे. विशेष करुन स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना आणि अभ्यास करणाऱ्या तरुणाईला या आजारांचा जास्त सामना करावा लागत आहे. कारण ते आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये बदल होत असल्याचे दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठीचा विचार केला असता दररोज शेकडो रुग्ण अशा आजारांवर उपचारासाठी रुग्णालयात पोहोचत आहेत. याठिकाणी तरुणाईला आजारांपासून दूर राहून त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता येईल यासाठी डॉक्टर त्यांना सतत योग्य ते सल्ले देत आहेत.
अशाप्रकारे करा बचाव -
हाडांचे डॉ. हनुमान प्रसाद यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, तरुणाईला पौष्टिक आहाराची गरज आहे. मात्र, तरुण पौष्टिक आहारापासून दूर जात आहेत. तरुणांच्या सांधेदुखी, गुडघेदुखी, युरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे, असे प्रकार आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत तरुणांनी खानपान योग्य करावे, सकाळी लवकर उठावे, व्यायाम करावा, जंक फूडचे सेवन अजिबात करू नये, तसेच जेवण योग्य वेळी करावे, वेळेवर झोपावे, पुरेशी झोप घ्यावी आणि कॅल्शियमची कमतरता पूर्ण होण्यासाठी दररोज एक ग्लास दूध प्यावे, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी दिला.
सूचना : वर दिलेली माहिती ही तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. कोणतेही औषधी वगैरे वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.