एका आठवड्यात किती वजन कमी करावे?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एका आठवड्यात 0.5 किलो ते 1 किलो वजन कमी करणे हे सुरक्षित आणि शाश्वत मानले जाते. या गतीने वजन कमी केल्यास तुमचे शरीर आवश्यक पोषक घटक गमावत नाही. 1 किलोपेक्षा जास्त वजन घटवणे शक्य आहे, परंतु हे वजन चरबीचे नसून, शरीरातील पाणी किंवा स्नायूंचे असू शकते.
advertisement
जलद वजन घटवण्याच नुकसान
पोषक तत्वांची कमतरता: अतिजलद वजन कमी करण्यासाठी कठोर आणि अपूर्ण आहार घेतल्यास शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची तीव्र कमतरता निर्माण होते.
स्नायूंचे नुकसान: जलद वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत शरीर चरबीऐवजी स्नायूंचे मांस गमावते. यामुळे शरीराची ताकद आणि चयापचय दर कमी होतो.
पित्ताशयातील खडे: एका अभ्यासानुसार, एका आठवड्यात 1.5 किलोपेक्षा जास्त वजन कमी करणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचा धोका वाढतो.
थकवा आणि ऊर्जा कमी होणे: शरीराला पुरेसे पोषण न मिळाल्याने तीव्र थकवा आणि ऊर्जा कमी होणे अशा समस्या येतात.
चयापचय दर मंदावणे: शरीर जलद वजन कमी करण्याच्या स्थितीला 'धोका' समजते. यामुळे शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी चयापचय दर मंदावते, ज्यामुळे नंतर वजन पुन्हा जलद वाढू शकते.
केस गळणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी: अचानक झालेल्या पोषण कमतरतेमुळे केस गळणे, त्वचेच्या समस्या आणि रोगप्रतिकारशक्ती कमजोर होणे यांसारखे दुष्परिणाम दिसतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
