कोडरमा : बदलती जीवनशैली, रोजची धावपळ आणि अवेळी जेवण यामुळे आता आजारपणं प्रचंड वाढली आहेत. परंतु सुदृढ शरीर आणि निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने आपापल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ काढून स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक आजार असे असतात ज्यांचं निदान वेळेत होत नाही आणि जेव्हा तो आजार कळतो तेव्हा त्यावर उपचार करणं अवघड झालेलं असतं. किडनीसंबंधित आजारांमध्येही रुग्णांना असह्य वेदना सोसाव्या लागतात. त्यामुळे आज आपण या आजारांमध्ये साधारण कोणती लक्षणं जाणवतात, पाहूया.
advertisement
डॉ. अरविंद चरण मंगल (एमबीबीएस, एमडी मेडिसिन, डीएनबी नेफ्रोलॉजी) सांगतात की, निरोगी शरिरासाठी आहार संतुलित असणं सर्वाधिक गरजेचं असतं. आपण मनाला वाटतील ते पदार्थ खावे असं नाही, तर शरिरासाठी उपयुक्त अशा पदार्थांचा आहारात समावेश असायला हवा. जीवनशैली असंतुलित असेल तर डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास होतो. हळूहळू किडनीसंबंधित व्याधी समोर येतात.
टूथपेस्ट बदलली, तरी तोंडाचा वास जाईना? ही दुर्गंधी श्वासांची; आता उपाय एकच!
किडनीच्या आजारांची सुरूवातीची लक्षणं काय?
डॉ. अरविंद चरण मंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये असं दिसून आलंय की, जेव्हा व्यक्तीची 80% किडनी खराब होते तेव्हा आपल्याला किडनीचा आजार झाल्याची जाणीव तिला होते. पाय सूजणं, अशक्तपणा येणं, शरिराला खाज येणं, भूक न लागणं ही किडनी खराब होण्याची सुरूवातीची लक्षणं आहेत. शिवाय या काळात उलटीसारखंदेखील वाटतं.
अनेकजण सकाळी पाणी पितात, पण एकच चूक करतात; तुम्हाला माहितीये ना योग्य पद्धत?
दारूपासून दूर राहा!
डॉक्टरांनी सांगितलं की, किडनीच नाही, तर सर्व अवयव सुदृढ ठेवण्यासाठी आधी आपल्या सवयी चांगल्या असायला हव्या. दारूचं व्यसन असेल तर ते सर्वात आधी सोडा. शिवाय दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा. वर्षातून एकदातरी किडनीची तपासणी व्हायला हवी. दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीची किडनी वेगाने खराब होते, त्यामुळे दारू आजच सोडा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
