पित्त होण्याची कारण कोणती?
सध्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अधिकतर लोकांना पित्ताचा त्रास होतो. यात मुख्यत्वे भूक लागल्यावरही न खाणे, कमी किंवा अति मात्रे मध्ये खाणे, जेवणानंतर लगेच झोपणे, रात्री जागरण करणे, भूक मारण्यासाठी किंवा झोप घालवण्यासाठी चहा, कॉफी अतिप्रमाणात घेणे, दारू, सिगारेट, तंबाखू सारखे व्यसन करणे, तसेच प्रोटीनच्या नावाखाली मांसाहार आणि कडधान्याचे सेवन करणे ही पित्त वाढण्याची प्रमुख कारण आहेत.
advertisement
पित्त वाढल्याची लक्षण :
शरीरात पित्त वाढलं की छातीमध्ये जळजळ होणे, मळमळ होणे, उलट्या होणे, डोकं दुखणे, चक्कर येणे, पोटात दुखणे, भूक न लागणे अशी विविध लक्षणं शरीरात जाणवू लागतात.
Urine Problem : लघवीच्या वेळी जळजळ, वेदना जाणवतात? या घरगुती उपचारांनी मिळेल आराम..!
पित्ताच्या त्रासावर घरगुती उपाय :
पित्ताचा त्रास दूर करायचा असेल तर जीवनशैलीत आणि आहारात काही बदल करणे गरजेचे आहे. पित्ताच्या त्रास दूर करण्यासाठी तुम्ही दर 4 तासांनी खाल्ले पाहिजे, भूक लागल्यावर खावे, दीर्घकाळ उपाशी पोटी राहू नये, अन्न प्रमाणात खाणे. पित्ताचा त्रास होत असलेल्या रुग्णांनी आहारात तुपाचा वापर वाढवावा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशीपोटी तूप घेतल्याने पचनशक्ती वाढते तसेच खडीसाखर किंवा केळ खाल्ल्याने पित्त कमी होते.
पित्त कमी करण्यासाठी पंचामृत देखील रामबाण उपाय ठरतं. तुम्ही दूध, दही, तूप, मध, साखर किंवा केळ यांच्यापासून बनलेलं पंचामृत पित्त कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. तज्ज्ञ डॉक्टर स्वाती खारतोडे यांच्या सांगण्यानुसार जर महिनाभर रोज सकाळी उपाशीपोटी पंचामृतचे सेवन केल्यास 15 दिवस ते 3 आठवड्यांमध्ये पित्त कमी होऊ शकेल. पंचामृत बनवण्यासाठी तुम्ही 2 भाग दही आणि बाकी सर्व जिन्नसांचा प्रत्येकी एक भाग वापरून तयार करावे.