अशा परिस्थितीत, जर तुम्हाला मटार घरीच साठवून ठेवायच असतील आणि वर्षभर त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक सोपी आणि प्रभावी पद्धत सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्ही मटार अनेक महिन्यांपर्यंत फ्रेश ठेवू शकता आणि तिची चव अगदी ताज्या मटारसारखीच राहील.
वर्षभरासाठी असे साठवा मटार
मटारचा सिझन सुरू आहे आणि जर तुम्हाला ते वर्षभरासाठी साठवायचे असेल, तर फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा आणि त्यात एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर घाला. पाणी चांगले उकळल्यानंतर त्यात मटार घाला आणि 5 मिनिटे शिजू द्या. त्यानंतर मटार गाळून घ्या. एका भांड्यात बर्फाचे तुकडे आणि पाणी घेऊन त्यात मटार टाका. यामुळे मटरचा रंग आणि चव ताजी राहील.
advertisement
पूर्णपणे पाणी निथळू द्या
मटार बर्फाच्या पाण्यातून काढून जाळीच्या भांड्यात ठेवा, जेणेकरून तिचे पाणी नीट निथळून जाईल. त्यानंतर स्वच्छ कपड्यावर मटार पसरवून सुकू द्या. मटार पूर्णपणे सुकल्यानंतर ते एअरटाइट डब्यात भरून फ्रीजरमध्ये ठेवा. तुम्ही ते प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्येही पॅक करू शकता, फक्त त्यात हवा जाऊ देऊ नका. अशा प्रकारे तुम्ही मटारचा आस्वाद वर्षभर घेऊ शकता.
जितकी गरज असेल तितकेच मटार बाहेर काढा आणि पुन्हा पिशवी नीट बंद करून ठेवा. या टिप्स फॉलो केल्यास तुम्ही केवळ मटारची चव जपून ठेवता असे नाही, तर ते वर्षभर वापरूही शकता. ही पद्धत सोपी आहे आणि यामुळे मटारचे पोषणमूल्यही टिकून राहते. त्यामुळे या सिझनमध्ये हिरवे मटार साठवा आणि वर्षभर त्याचा आनंद घ्या.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
