वाढलेल्या इस्ट्रोजेनची लक्षणे
अनियमित किंवा जास्त मासिक पाळी येणे
स्तनांना सूज येणे
मूड स्विंग्स, चिडचिडेपणा आणि चिंता
वजन वाढणे, विशेषतः कंबर आणि मांड्यांमध्ये
थकवा आणि डोकेदुखी
निद्रानाश
पोटाचा ताण
लठ्ठपणा
केस गळणे
शरीरावर जास्त केस येणे.
लठ्ठपणा
महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेनचे प्रमाण वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे लठ्ठपणा. वाढत्या लठ्ठपणामुळे इस्ट्रोजेन हार्मोनचे उत्पादन वाढते. लठ्ठपणामुळे शरीरात इस्ट्रोजेनचे विघटन आणि उत्सर्जन होण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी जास्त राहते.
advertisement
खाण्याच्या चुकीच्या सवयी
प्रक्रिया केलेले अन्न, कर्बोहायड्रेट्स आणि साखरेचे जास्त सेवन शरीरात जळजळ वाढवते. ज्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. अल्कोहोल सेवन केल्याने यकृतावर दबाव येतो, ज्यामुळे शरीर इस्ट्रोजेनचे योग्यरित्या चयापचय करू शकत नाही.
ताण आणि झोप
जर तुम्ही जास्त ताण घेतला तर कॉर्टिसोलची पातळी वाढते ज्यामुळे शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वेगाने वाढू लागते. ताणतणावामुळे झोप न येण्याची समस्या निर्माण होते, ज्यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते.
हार्मोनल औषधे
काही गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी इस्ट्रोजेनची पातळी वाढवू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणे जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. डॉक्टर नेमके कारण शोधू शकतात आणि योग्य उपचार किंवा जीवनशैलीतील बदल सुचवू शकतात. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)