जाणून घेऊया ‘त्या’ जादुई भांड्याविषयी
आयुर्वेदानुसार, तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.तांबांच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने फक्त रक्तातील साखरच नियंत्रित होत नाही तर मधुमेहाचा धोका सुद्धा टाळता येतो. तांब्याच्या भांड्यात साठवलेलं पाणी हे डायबिटीसच्या रूग्णांसाठी रामबाण उपाय आहे. तांब्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे लाल रक्त पेशी तयार होण्यास आणि जखम लवकर भरून येण्यास मदत होते. आपल्याला माहितीच आहे की, डायबिटीस असलेल्या रूग्णांना जर कोणती जखम झाली तर ती जखम भरून यायला वेळ लागतो. त्यामुळे डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिणं फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती, पचनशक्ती वाढते
तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती देखील मजबूत होते. यामुळे डायबिटीस नियंत्रणात आणणं सोपं होतं. तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात पोषकद्रव्ये सहजपणे शोषली जातात. असं पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तांबं संपूर्ण शरीराला डिटॉक्सिफाय करते. तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायल्याने पोट स्वच्छ व्हायला मदत होते. शिवाय त्वचेला उजळाही मिळतो. तांब्याच्या जंतू मारण्याच्या गुणधर्मामुळे तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही. त्यामुळे ते पाणी खऱ्याअर्थाने आपल्यासाठी ‘जीवन’ ठरते.
तांब्याच्या भांड्यातलं पाणी कसं प्यावं?
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यावर ते रिकाम्या पोटी प्या. मात्र एक काळजी नक्की घ्या की, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी तुमची जर औषधं सुरू असतील तर तांब्यांच्या भांड्यातलं पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.