केस गळण्याची कारणं
योग्य काळजी न घेणं : अनेक जण केसांची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे केसांना योग्य त्या प्रमाणात पोषकतत्त्वे न मिळाल्याने केसांचं नुकसान होऊन ते तुटू शकतात किंवा पांढरे होऊ शकतात.
साबणाचा वापर: अनेक जण केस धुताना शॅम्पूऐवजी साबणाचा वापर करतात. साबणात असलेल्या हानिकारक केमिकल्समुळे केसांचं नुकसान होऊन ते पांढरे होऊ शकतात किंवा केसगळतीचं प्रमाणही वाढून टक्कलही पडू शकतं.
advertisement
तेल न लावणे : केसांच्या आरोग्यासाठी तेल हे महत्त्वाचं आहे. बदाम तेल किंवा खोबरेल तेलाच्या औषधी गुणधर्मांमुळे केस मजबूत आणि सुंदर दिसतात. मात्र आजच्या फॅशनच्या युगात अनेक जण तेलाचा वापर न करता क्रिम किंवा हेअर जेल वापरू लागले आहेत. त्यामुळे केसांचं योग्य पद्धतीने पोषण झाल्यामुळे केस पांढरे पडू शकतात.
अनुवंशिकता : केस गळती किंवा टक्कल पडण्याच्या कारणांमध्ये अनुवंशिकता हे एक महत्त्वाचं कारण आहे.
प्रदूषण : वाढत्या प्रदुषणामुळे त्वचा आणि केसाचं नुकसान होऊन केस गळणे किंवा केस पांढरे होण्याच्या समस्या निर्माण होतात.
पोषकतत्त्वांची कमतरता : या कारणाचा आपल्यापैकी अनेकांनी विचारही केला नसेल. अनेकजण केसांसाठी विविध ट्रिटमेंट जरी घेत असले तरीही आपल्या शरीरात असलेल्या व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी आणि झिंकच्या कमतरतेमुळे लहान वयात केस पांढरे होतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी फक्त तेल किंवा हेअर ट्रिटमेंट करून शांत न बसता किंवा कृत्रिमरित्या डाय किंवा अन्य ट्रिटमेंट करू केस काळे करून घेण्यापेक्षा शरीराला योग्य त्या प्रमाणात पोषकतत्वं मिळतील याची काळजी घ्या. याशिवाय योग्य तो पोषक आहार घेतल्याने केसगळतीची किंवा अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते.
जाणून घेऊयात केस पांढरे होण्यासाठी कोणत्या पोषकतत्त्वांची कमतरता कारणीभूत असते आणि कोणत्या अन्नपदार्थांच्या सेवनाने केसांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.
व्हिटॅमिन बी:
केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 खूप महत्वाचं आहे. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे केस पांढरे होतात आणि केस गळतीचा त्रास सुरू होतो. या जीवनसत्त्वांची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास टक्कल पडू शकतं.
उपाय :
आहारात व्हिटॅमिन बी, दूध, दही, चीज, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करावं.
व्हिटॅमिन सी:
व्हिटॅमिन सी शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांपैकी एक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. आहारतज्ञांच्या मते, केस गळणे, अकाली पांढरे होणे यासाठी व्हिटॅमिन सी ची कमतरता हे एक प्रमुख कारण असू शकतं. योग्य वेळेत ही कमतरता भरून काढली नाही तर टक्कल पडण्याची भीती असते.
उपाय :
किवी, आवळा, टोमॅटो, संत्री आणि हिरव्या भाज्या यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खावेत.
व्हिटॅमिन डी:
व्हिटॅमिन डी केवळ हाडे मजबूत करत नाही तर केसांच्या वाढीसाठी देखील खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होऊन कमकुवत होतातच मात्र याचा केसांवरही परिणाम दिसून येतो ज्यामुळे केस पांढरे होऊ लागतात.
उपाय :
सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढता येते.अंडी, मासे, मशरूम, चीज अशा अन्नपदार्थांच्या सहाय्याने तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही व्हिटॅमिन डीच्या गोळ्यासुद्धा घेऊ शकता.
झिंक :
शरीरात झिंकच्या कमतरतेमुळेही केस पांढरे आणि कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
उपाय:
अंडी, पालक, भोपळ्याच्या बिया आणि छोले खाऊ शकता. या पदार्थांच्या सेवनाने केस पांढरं होण्याचं प्रमाण कमी होईलय याशिवाय केसांची वाढही चांगली होईल.