एवढेच नाही तर केळी हेल्दी फॅट आणि प्रोटीनचा समृद्ध स्रोत देखील मानली जाते. पण केळीसंदर्भात एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
वास्तविक, एका ग्राहकाने केळीवरील पांढऱ्या डागांबद्दल चेतावणी दिली आहे. असे कोणतेही चिन्ह केळीवर दिसल्यास अशा केळीपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. अशा परिस्थितीत त्यांनी असा इशारा का दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
advertisement
या व्यक्तीनी अशा प्रकारची केळी न खाण्याची सुचना फेसबुकवर पोस्ट केली, एका विचित्र दिसणाऱ्या केळीचे छायाचित्र, ज्यामध्ये त्या केळीच्या वरच्या बाजूला एक विचित्र पांढरा फुगवटा दिसत होता. त्याने फोटोच्या वरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या केळ्यावर हा पांढरा डाग का आहे हे कोणाला माहीत आहे का?'
केळीचा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि त्यानंतर सुरुवात झाली ती चर्चांना. एका वापरकर्त्याने चिंतेने प्रतिक्रिया दिली, 'हे स्पायडर अंड्यासारखे दिसते.'
त्याच वेळी, दुसऱ्या वापरकर्त्याने या संशयाची पुष्टी करण्यासाठी 'नक्कीच तेथे कोळी आहे' असे सांगितले. यावर महिला ग्राहकाने केळीचा संपूर्ण घड डस्टबिनमध्ये टाकून देण्यासाठी सांगितले.
खरंतर केळ्यांवर सफेद रांगाचा डाग हा कोळ्याचं किंवा एखाद्या किटकाचं घर असल्याचं दर्शवतं. त्यामुळे ते न खालेलं किंवा फोकून दिलेलंच बरं
या कीटकांमुळे किती नुकसान होते?
एएसडीएच्या प्रवक्त्याने केळीवर आढळणारे रहस्यमय 'पांढरे ठिपके' बद्दल स्पष्ट केलं की 'ते विशिष्ट 'पांढरे डाग' हे मीली बग्सचे घरटे असल्याचे दिसते, ते पूर्णपणे निरुपद्रवी आहेत, परंतु इतर कीटकांप्रमाणेच ते स्वतःचे घर बनवण्यास प्राधान्य देतात आणि ते केळी मध्ये घर बांधतात.