का वाढतो धोका?
अनेकदा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. मोनोपॉजनंतर महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी झपाट्याने कमी होते. हृदय सुरक्षित ठेवण्यात हा हार्मोन महत्त्वाची भूमिका बजावतो. इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका देखील वाढतो. यामुळेच 45 ते 55 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका जास्त असतो.
advertisement
हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणं
बऱ्याचदा महिला थकवा, अशक्तपणा आणि वेदना यांना सामान्य समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण नंतर त्याचा गंभीर परिणाम आरोग्यावर दिसून येतो.
छातीत किंवा डाव्या हातात वेदना
श्वास लागणे
अचानक घाम येणे
चक्कर येणे
ही सर्व लक्षणे हृदयविकाराचा झटक्याची संभाव्यता दर्शवू शकतात.
कशी घ्यावी काळजी?
मोनोपॉजनंतर निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून हृदयरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
निरोगी आहार घ्या - तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या, संपूर्ण धान्य आणि निरोगी चरबी समाविष्ट करा.
नियमित व्यायाम करा - दररोज ३० मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करा.
ताण कमी करा - रजोनिवृत्ती दरम्यान ताण वाढतो, म्हणून ध्यान आणि प्राणायामची मदत घ्या.
नियमित तपासणी करा - वेळोवेळी तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी तपासा.
धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर रहा - या सवयींचा हृदयावर थेट नकारात्मक परिणाम होतो.
कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?
पुरेशी झोप घ्या आणि रात्री उशिरापर्यंत जागे राहणे टाळा.
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा
जर एखाद्या महिलेला आधीच मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर अधिक काळजी घ्या. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)