TRENDING:

Weight Loss : वजन कमी करण्याचा प्रवास होईल सोपा, शक्तीबरोबर युक्तीही वापरा, वजन नक्की होणार कमी

Last Updated:

खाण्याच्या सवयींमधे झालेले बदल आणि जीवनशैलीतले बदल यामुळे, लठ्ठपणाचा धोका झपाट्यानं वाढतो आहे. वाढत्या वजनाची तुम्हालाही चिंता सतावत असेल तर या टिप्स तुम्हाला उपयुक्त ठरतील. इथे दिलेल्या टिप्ससोबत व्यायाम करण्याचा, वजन कमी करण्याचा प्रवास काहीसा सुकर होऊ शकेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वजन जितक्या वेगानं वाढतं तितक्या वेगानं कधीच कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करणं हे मोठं आव्हान असतं. वजन कमी करणं म्हणजे काही नियम पाळावे लागणार हे आलंच. त्यासाठी व्यायाम करणं आणि काही आवडते पदार्थ टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे वजन कमी करणं प्रत्येकासाठी सोपं नसतं.
News18
News18
advertisement

खाण्याच्या सवयींमधे झालेले बदल आणि जीवनशैलीतले बदल यामुळे, लठ्ठपणाचा धोका झपाट्यानं वाढतो आहे. वाढत्या वजनाची तुम्हालाही चिंता सतावत असेल तर या टिप्स तुम्हाला उपयुक्त ठरतील. इथे दिलेल्या टिप्ससोबत व्यायाम करण्याचा, वजन कमी करण्याचा प्रवास काहीसा सुकर होऊ शकेल.

Cholesterol : चेहऱ्यातले बदल सांगतात तब्येतीचे हालहवाल, जाणून घ्या सविस्तर

लहान ध्येयं - Small targets - कोणतंही मोठं काम करताना सुरुवातीला दडपण येतं. हे काम टप्प्याटप्प्यानं केलं तर ते सोपं वाटतं. हीच युक्ती वजन कमी करण्यासाठी वापरुन पाहता येईल. लहान ध्येयं ठेवणं म्हणजे काय ते पाहूया. सुरुवातीला दररोज किंवा दर आठवड्याला फक्त पंधरा-वीस मिनिटं व्यायाम करायचा असं ठरवा. ध्येय सहज वाटतं आणि स्वतःला प्रेरित ठेवता येतं.

advertisement

शारीरिक हालचाल - Physical activity - वजन कमी करण्यासाठी शारीरिक हालचाल आवश्यक आहे. कारण यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि मूड देखील सुधारू शकतो.

Dry Skin : हिवाळ्यात कशी घ्याल कोरड्या त्वचेची काळजी, वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

स्वत:ला ट्रिट द्या - वजन कमी करण्याचा सर्वात मजेदार मार्ग म्हणजे स्वतःला भेटवस्तू देऊन यश साजरं करणं. उदाहरणार्थ, आठवडाभर कसरत केल्यानंतर आवडता पदार्थ खा किंवा चित्रपट पाहा. यामुळे हे यश स्मरणात राहिल आणि स्वत:ला प्रोत्साहन मिळेल, यामुळे मनात सकारात्मकता येईल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यात घडलं! 'मफिन'ला मिळालं नवं आयुष्य,श्वानावर अवघड शस्त्रक्रिया यशस्वी Video
सर्व पहा

सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक बोला - एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करता किंवा बोलता त्यामुळे अधिक प्रेरणा मिळते. वजन कमी करण्याबद्दल सकारात्मक बोलायला सुरुवात करा आणि त्यासाठी तुम्ही कोणती पावलं उचलणार आहात याबद्दल मोकळेपणानं बोला.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight Loss : वजन कमी करण्याचा प्रवास होईल सोपा, शक्तीबरोबर युक्तीही वापरा, वजन नक्की होणार कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल