TRENDING:

आवडीनं खाताय? आजच सोडा सवय; हेच इन्स्टंट नूडल्स तुम्हाला भरती करतील रुग्णालयात

Last Updated:

अनेकजण दररोज किंवा एक दिवसाआड नूडल्स खातात. अशा लोकांना निश्चितच किडनीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कितीही आवडत असले तरी नूडल्स खाण्याची सवय आजच सोडा.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिखा श्रेया, प्रतिनिधी
केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आजारही जडू शकतात.
केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आजारही जडू शकतात.
advertisement

रांची : आजकाल केवळ लहान मुलंच नाही, तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना इन्स्टंट नूडल्स प्रचंड आवडतात. एकतर ते काही मिनिटात तयार होतात आणि चवीला अत्यंत स्वादिष्ट लागतात, त्यामुळे सर्वजण हे नूडल्स अगदी आवडीने खातात. परंतु हे स्वादिष्ट नूडल्सच आरोग्यासाठी प्रचंड हानीकारक असतात. या नूडल्सच्या मसाल्यांमुळे आपण थेट रुग्णालय गाठू शकता.

झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या रिम्स रुग्णालयातील न्यूरो सर्जन डॉ. विकास यांनी दिलेल्या माहितीनुसार, नूडल्स शरिरासाठी घातक असतात. त्यांमुळे केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आजारही जडू शकतात. विशेषतः किडनीचा आजार होऊ शकतो.

advertisement

जेवा आणि ताटपण खाऊन टाका; विद्यार्थ्यांनी बनवली अनोखी भांडी, खाण्यासाठी अट फक्त एकच!

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नूडल्समध्ये जे मसाले असतात. त्यांमध्ये शिसं असतं. म्हणूनच एकदा भारतात नूडल्सवर बंदी आणण्यात आली होती, जी कालांतराने हटवली, परंतु आतादेखील नूडलडमध्ये शिसं असतं, मात्र अत्यंत कमी प्रमाणात. परंतु त्याचाही शरिरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. किडनी आणि नसा डॅमेज होऊ शकतात. शिवाय सतत चिडचिड होणं, मन अस्थिर असणं, असा त्रासही जाणवू शकतो. याचं कारण असं आहे की, नूडलडमध्ये आढळणाऱ्या शिस्यामुळे डोक्यातल्या नसा डॅमेज होतात. शिवाय किडनीच्या पेशीही खराब होऊ शकता. या सगळ्याचा परिणाम वजनावर होतो. वजन वाढू शकतं, ताण-तणावही वाढतो.

advertisement

लसूण उपाशीपोटी खाल्ल्यास वजन झटपट होतं कमी! फक्त खाताना करू नका 'ही' चूक

डॉ. विकास यांनी अशीही माहिती दिली की, अनेकजण दररोज किंवा एक दिवसाआड नूडल्स खातात. अशा लोकांना निश्चितच किडनीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कितीही आवडत असले तरी नूडल्स खाण्याची सवय आजच सोडा. आपण 15 दिवसांतून एकदा किंवा महिन्यातून एकदा नूडल्स खाल्ल्यास त्यातून काही त्रास होणार नाही, असं डॉक्टर म्हणाले.

advertisement

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आवडीनं खाताय? आजच सोडा सवय; हेच इन्स्टंट नूडल्स तुम्हाला भरती करतील रुग्णालयात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल