आतड्यांतील बद्धकोष्ठता दूर करण्यापासून ते हाडं मजबूत करण्यापर्यंत, तुपाचा उपयोग होतो. त्वचेचा पोत सुधारण्यासाठी तुपाचा उपयोग केला जातो. तुपामुळे त्वचेला आतून पोषण मिळतं.
Health Care : टेक नेक सिंड्रोम म्हणजे काय ? काय आहेत लक्षणं, कारणं, उपचार
तुपामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक चमक परत आणण्यास मदत होते. तूप योग्य प्रमाणात वापरल्यानं, त्वचा निरोगी राहते. आयुर्वेदात, तूप थंडगार, गुळगुळीत रसायन मानलं जातं. तूप त्वचेच्या आजारांचं मुख्य कारण असलेल्या वात आणि कफ यांचं संतुलन करण्यासाठीही देखील मदत करतं.
advertisement
तुपामुळे त्वचेचं खोलवर पोषण होतं आणि चेहऱ्यावरील घाण आणि मृत पेशी काढून टाकण्यास तुपामुळे मदत होते. महत्वाची गोष्ट म्हणजे तुपात वृद्धत्व रोखण्याची क्षमता असते म्हणजेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी तूप खाणं फायदेशीर ठरू शकतं.
देशी तुपामुळे त्वचा मऊ राहते आणि हिवाळ्यात कोरडेपणापासून त्वचेचं संरक्षण होतं. तूप कसं खावं यासाठी काही खबरदारी घेणं महत्वाचं आहे. प्रथम, तूप कधी आणि कसं वापरायचं ते समजून घेऊया.
तूप आहारात असू दे पण मर्यादित प्रमाणात. आहारातल्या विविध पदार्थांमधे तूप असू दे तसंच रात्री चेहऱ्याच्या कोरड्या भागांवर तूप लावता येतं.
Obesity : वजन कमी करा, लठ्ठपणामुळे मेंदू होतो वृद्ध, जाणून घेऊया कसा होतो परिणाम
तूप वापरताना कोणती खबरदारी घ्यायची हे समजून घेऊया. पचनशक्ती खराब असेल तर तूप मर्यादित प्रमाणात वापरा. त्वचा तेलकट असेल तर तूप कमी प्रमाणात वापरा. कारण त्यामुळे मुरुमं आणि पुरळ येऊ शकतं.
हृदयरोग आणि मधुमेह असलेल्यांनीही तूप खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हृदयरोग्यांना कमी चरबी खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण तुपामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, जे हृदयरोग असलेल्यांसाठी धोकादायक आहे.
