TRENDING:

शंभुराजने प्राजक्तासाठी सोडलं Non-veg; 365 दिवस चिकन खाणाऱ्याने अचानक सोडलं तर काय होईल परिणाम?

Last Updated:

कोणतीही गोष्ट अचानक थांबवल्याने शरीरात काय बदल होतात? असा प्रश्न इथे निर्माण होतो. एखादी गोष्ट अचावक थांबवली तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या फेजमधून जावे लागते आणि त्याचे कधीकधी उलट परिणाम देखील होतात. त्यामुळे ते हळूहळू किंवा एका पद्धतीने सोडावं लागतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर आपलं नातं ऑफिशिअल केल्यानंतर तर तिचे फॅन्स खूपच आनंदी झाले. प्राजक्ता आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल अधीक जाणून घेण्याची उत्सुकता वाढील आहे.
प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज
प्राजक्ता गायकवाड आणि शंभुराज
advertisement

शंभुराज खुटवडे कोण? तो काय करतो? प्राजक्ता आणि शंभुराजचं प्रेम कसं जुळलं? कधीपासून ही लव्हस्टोरी सुरु होती? असे असंख्य प्रश्न फॅन्सच्या मनात आहेत. त्यात हल्लीच प्राजक्तानं एका मुलाखतीत नवऱ्याचं कौतुक करत त्याने तिच्यासाठी केलेल्या कॉम्प्रोमाइजबद्दल सांगितलं. त्यामुळे लोकांना तिच्या नवऱ्याचं चांगलंच कौतुक आहे.

राजश्री मराठीशी बोलताना प्राजक्ताने सांगितलं की, लग्नासाठी तिने शंभुराजकडे अट ठेवली होती की तिला नॉनवेज खाणारा नवरा नको आहे. तेव्हा शंभुराज पंढरपुरला गेला आणि त्याने गळ्यात माळ घातली. प्राजक्ता म्हणाली 365 दिवस नॉनवेज खाणाऱ्या व्यक्ती माझ्यासाठी नॉनव्हेज सोडतो. हे खूप मोठं सॅक्रिफाइज आहे.

advertisement

पण कोणतीही गोष्ट अचानक थांबवल्याने शरीरात काय बदल होतात? असा प्रश्न इथे निर्माण होतो. एखादी गोष्ट अचावक थांबवली तर आपल्या शरीराला वेगवेगळ्या फेजमधून जावे लागते आणि त्याचे कधीकधी उलट परिणाम देखील होतात. त्यामुळे ते हळूहळू किंवा एका पद्धतीने सोडावं लागतं. पण मग असं असेल तर शंभुराजने किंवा त्याच्या सारख्या 365 दिवस नॉनवेज खाणाऱ्या व्यक्तीने अचानक नॉनवेज खाणं सोडलं तर मग त्याच्यावर काय आणि कसा परिणाम होईल?

advertisement

बऱ्यांश फूड एक्सपर्ट आणि डायटिशियन सांगतात की नॉनवेज अचानक सोडल्यास, शरीरात काही लक्षणीय सकारात्मक बदल घडू शकतात, परंतु काही बाबतीत काळजी घेणं आवश्यक असतं.

पहिलं, शरीरातील सॅच्युरेटेड फॅट कमी होते, ज्यामुळे LDL — ‘खराब’ कोलेस्ट्रॉल कमी होतो, आणि हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

दुसरं, फायबरचं सेवन वाढतं, खास करून जर आपण शाकाहारी अन्न अधिक घेतलं, तर जठरविकारात सुधारणा होऊ शकते, वजन कमी होऊ शकतं आणि पचनसंस्था अधिक निरोगी होते.

advertisement

तिसरं, शरीरातल्या सूज आणि ऑक्सिडेशन मध्ये घट होऊ शकते, ज्याचा परिणाम म्हणजे टाइप–2 डायबेटीस, हृदयविकार आणि काही कर्करोगांचा धोका देखील कमी होतो.

चौथं, लिव्हरमध्ये वाढलेल्या फायबरमुळे, gut-microbiomeचा संतुलन सुधारतो, ज्यामुळे TMAO सारख्या हानिकारक पदार्थांची निर्मिती कमी होऊ शकते.

पण हे लक्षात घ्या की नॉनवेज सोडल्याने शरीरासाठी आवशक असलेल्या काही घटकांनी अचानक कमतरता होते. शरीराला आवश्यक पोषकतत्त्व (प्रोटीन, B12, लोह, झिंक) मिळवायची गरज असते. जर ते पुरेसे न घेतले, तर अॅनिमिया, थकवा, मांसपेशींचे दुर्बलतेचे लक्षण दिसू शकतात.

advertisement

नॉनवेज अचानक सोडल्यास हृदयविकार, वजन, पचन, सूज यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. पण, दीर्घकालीन आरोग्य राखायचं असेल तर पूरक पोषण, नियमन आणि तज्ञांच्या सल्ल्याने काळजीपूर्वक बदल करणं अत्यंत गरजेचं आहे.

(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
शंभुराजने प्राजक्तासाठी सोडलं Non-veg; 365 दिवस चिकन खाणाऱ्याने अचानक सोडलं तर काय होईल परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल