TRENDING:

Pre Workout Nutrition : जिममधे जाण्याआधी आहार कसा असावा ? व्यायाम झाल्यावर किती वेळानं खायचं ? प्री आणि पोस्ट जिम न्यूट्रिशन टिप्स

Last Updated:

जिम वर्कआऊट पूर्ण होईपर्यंत उत्साही राहण्यासाठी व्यायामापूर्वी काहीतरी खाण्याची आवश्यकता आहे. वर्कआउटपूर्वी योग्य पोषण का आवश्यक असतं आणि त्यात काय खाणं आवश्यक असतं समजून घेऊयात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही जिममधे नियमित व्यायाम करत असाल तर ही माहिती वाचणं खूप आवश्यक आहे. काहींना व्यायामानंतर लगेचच थकवा जाणवत असेल किंवा व्यायाम करण्यासाठी उर्जेची कमतरता भासत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
News18
News18
advertisement

जिम वर्कआऊट पूर्ण होईपर्यंत उत्साही राहण्यासाठी व्यायामापूर्वी काहीतरी खाण्याची आवश्यकता आहे. वर्कआउटपूर्वी योग्य पोषण का आवश्यक असतं आणि त्यात काय खाणं आवश्यक असतं समजून घेऊयात.

कार्बोहायड्रेट्स: योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकं खाल्ल्यानं स्टॅमिना आणि शक्ती वाढते. कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोजमधे विघटन होतं, ज्यामुळे स्नायू आणि मेंदूला इंधन मिळतं आणि कमी थकवा येतो.

advertisement

Brain Stroke : ब्रेन स्ट्रोक कशामुळे होतो ? जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

प्रथिनं: स्नायूंची ताकद राखण्यासाठी आणि स्नायूंच्या दुरुस्तीसाठी प्रथिनांची मदत होते. व्यायामापूर्वी आणि नंतर योग्य प्रमाणात प्रथिनं खाल्ल्यानं स्नायू जलद बरे होण्यास मदत होते.

चरबी: ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी थोड्या प्रमाणात चरबी देखील आवश्यक असते. पण ते पचण्यास जास्त वेळ लागतो, परंतु व्यायामापूर्वी ते टाळायला हवं.

advertisement

एकाच वेळी जास्त खाणं टाळा - दर तीन ते पाच तासांनी खाल्ल्यानं ऊर्जा पातळी राखण्यास मदत होते आणि रिकव्हरी होते. तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिनं दोन्हीही आवश्यक आहेत. व्यायामाच्या दोन-तीन तास ​​आधी प्रथिनं आणि थोड्या प्रमाणात चरबी म्हणजेचं फॅट्स खाल्ल्यानं पचनासाठी आणि ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

आहारासाठी काही टिप्स लक्षात ठेवा -

advertisement

तांदूळ आणि चिकन

नट बटर आणि केळीसह ओटमील

फळं आणि बदामाच्या दुधासह ओट्सपासून बनवलेले प्रोटीन स्मूदी.

कमी चरबीयुक्त माशांसह ग्रिल केलेले क्विनोआ आणि भाज्या

Cooking Habits : स्वयंपाकावर अवलंबून आहे पोट, या चुका टाळा, पचन होईल सोपं

व्यायामाच्या तीस-साठं मिनिटं आधी व्यायामाची वेळ जवळ येते तेव्हा पोट खराब होऊ नये म्हणून प्रथिनं, चरबी आणि फायबरचं सेवन मर्यादित करा. त्यासाठीचे काही पर्याय

advertisement

सुकामेवा

फळांसह ग्रीक योगर्ट

प्रोटीन बार किंवा स्पोर्ट्स ड्रिंक

व्यायामाच्या अर्धा तास आधी सुमारे दीड कप पाणी प्या.

व्यायामानंतर सुमारे अर्धा लीटर पाणी प्या.

व्यायामादरम्यान दर वीस मिनिटांनी थोडं थोडं पाणी प्या.

व्यायामापूर्वी काय टाळायचं लक्षात ठेवा -

जास्त चरबीयुक्त पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खाणं टाळा.

बीन्स आणि ब्रोकोलीसारखे जास्त फायबर असलेले पदार्थ खाणं

साखरयुक्त स्नॅक्स किंवा कँडी खाणं

जास्त कॅफिनचं सेवन टाळणं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेवगा दर तेजीत, आले आणि डाळिंबाला कसा मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

उपवास करताना व्यायाम करणं टाळा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pre Workout Nutrition : जिममधे जाण्याआधी आहार कसा असावा ? व्यायाम झाल्यावर किती वेळानं खायचं ? प्री आणि पोस्ट जिम न्यूट्रिशन टिप्स
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल