छोले आणि पनीर पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ, छोले, पनीर , तेल, कांदे, टोमॅटो , तमालपत्र , जीरे, काळी मीरी , लवंग , दालचिनी , स्टार फुल , मसाला वेलची , हिरवी मिरची, लाल मिरची पावडर , बिर्याणी मसाला , छोले मसाला ,आलं , लसूण , कोथिंबीर, मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
Home Remedy : न्यूमोनियावर जादूसारखे काम करतो हा चहा! डॉक्टरही सहमत, रोज प्यायल्याने होईल फायदा
छोले आणि पनीर पुलाव बनवण्यासाठी कृती
सुरुवातीला एक वाटी छोले धुऊन आठ तासांसाठी भिजत ठेवा. नंतर त्यातील पाणी बदलून कुकरमध्ये पाच-सहा शिट्ट्या देऊन शिजवून घ्या. तांदूळ स्वच्छ धुऊन बाजूला ठेवा. कुकर गरम करून त्यात तेल घाला आणि पनीरचे तुकडे हलकेसे फ्राय करून बाजूला काढा. त्यानंतर उरलेल्या तेलात जीरे आणि खडे मसाले टाकून फोडणी करा.
उभा चिरलेला कांदा आणि एक हिरवी मिरची घालून कांदा सोनेरी होईपर्यंत भाजा. आता टोमॅटो आणि कांदा-लसूण पेस्ट टाकून थोडं परता. शिजलेले छोले पाणी न घालता त्यात तांदूळ टाकून काही मिनिटे मध्यम आचेवर भाजून घ्या. नंतर साडेतीन वाटी गरम पाणी, बिर्याणी मसाला, छोले मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून हलवा. वरून फ्राय केलेले पनीर ठेवून दोन-तीन शिट्ट्या द्या. कुकर गार झाल्यावर पुलाव हलक्या हाताने मिक्स करा आणि तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.





