छत्रपती संभाजीनगर : गोकुळाष्टमी हा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. गोकुळाष्टमी म्हटलं की दहीहंडी आलीच आणि गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी ही साजरी केली जाते. या दिवशी सर्व ठिकाणी आवर्जून एक पदार्थ केला जातो तो म्हणजे गोपाळकाला. तर झटपट असा गोपाळकाला कसा करायचा ते सुद्धा अगदी 5 मिनिटांमध्ये याची रेसिपी छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी सांगितलेली आहे.
advertisement
गोपाळकालासाठी लागणारे साहित्य
पोहे, लाह्या, डाळिंब, सफरचंद (तुम्ही कुठलही फळ वापरू शकता.) ओलं खोबऱ्याचे काप, दही, हरभरा डाळ, काकडी, लोणचं (तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाचा किंवा कैरीचे लोणचे घेऊ शकता.) शेंगदाणे, साखर, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि तुळशीची पाने हे साहित्य लागेल.
यंदा जन्माष्टमीला कृष्णाला सजवा राशीनुसार! सर्व अडचणी हळूहळू होऊ शकतात दूर
गोपाळकाला कृती
सर्वप्रथम पोहे हे स्वच्छ धुऊन घ्यायचे. त्यानंतर एका भांड्यामध्ये तुम्ही धुऊन घेतलेले पोहे, लाह्या, डाळींबाचे दाणे सफरचंदाच्या फोडी, ओल्या खोबऱ्याच्या फोडी आणि दही टाकायचं. पण ते दही जास्त आंबट नसावं थोडंसं गोडसर दही टाकावं. त्यानंतर हरभरा डाळ टाकायची. पण ही डाळ अगोदर एक ते दोन तास भिजू घालत ठेवायची. त्यानंतरच टाकायची. काकडीच्या बारीक फोडी. लोणचं हे लोणचं तुम्ही मिक्सरमधून बारीक करून देखील घेऊ शकता. लोण्याची पेस्ट तुम्ही यामध्ये टाकू शकता. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे. तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले तरी चालेल. चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर आणि तुळशीचे पाने देखील टाकायचे.
यंदा जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि कशी करावी पूजा,Video
हे सर्व साहित्य एकत्र टाकून व्यवस्थित रित्या एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर वरतून डाळिंबाचे दाणे, थोडीशी कोथिंबीर आणि श्रीकृष्ण यांना आवडणारे तुळशीचे पाने टाकायचे. आणि असं झटपट हा गोपाळकाला बनवून तयार होतो. तर या गोकुळाष्टमीला तुम्ही हा गोपाळकालाची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा.