वर्धा : फळे खाणे आपल्या शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. कवठ हे फळ इतर फळांप्रमाणेच खूपच आरोग्यदायी आहे. पण ते खाणं इतर फळां एवढं सोपं नाही. बाकीची फळं कापली की लगेच खाता येतात किंवा काही फळांना तर कापण्याचीही गरज नसते. पण कवठ मात्र फोडावं लागतं, त्यात गूळ टाकावा लागतो आणि मग ते खावं लागतं. त्यामुळे बरेच जण कवठ खाणंच टाळतात. पण असं करू नका कारण कवठ खाण्याने शरीराला खूपच फायदे होतात. त्यामुळे पिकलेल्या कवठाची चटणी कशी करायची? याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.
advertisement
कवठाची चटणी बनवण्यासाठी साहित्य
एक पिकलेला कवठ, अर्धा वाटी गूळ, तीन ते चार लसूण कळ्या, तिखट मीठ हळद आणि जिरे हे साहित्य लागते.
घरच्या घरी कोबी पासून बनवा स्क्रीप्सी व्हेज ड्राय मंच्युरियन, सोप्या रेसिपीचा पाहा Video
कवठाची चटणी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम पिकलेला कवठ घेऊन गॅसवर भाजून घ्यायचा आहे. नाही भाजला तरी चालेल. मात्र भाजून घेतल्यास आतला गर लवकर काढता येतो. आता कवठ हे फोडून घ्यायचं आहे. आतला गर काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्यात अर्धा वाटी गूळ आणि दोन ते चार लसूण कळ्या अॅड करायच्या आहेत. त्यात हळद तिखट मीठ आणि जिरे आणि थोडसं पाणी अॅड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे.
यावेळी कवठामधील बिया बाहेर काढला तरी चालतील नाही काढला तरी काही हरकत नाही. आपल्याला काही दिवस ही चटणी स्टोअर करून ठेवायची असल्यास त्याला भाजून घेणे म्हणजे गरम करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मिक्सरमधून बारीक केलेला मिश्रण हे कढईमध्ये गरम करून घ्यायचा आहे. जेणेकरून गुळ शिजला जाईल हे करत असताना त्यात तेल अॅड करायची ही गरज नाही. चटणी गरम झाल्यावर त्याला एका भांड्यात काढून ठेवू शकता. अशाप्रकारे कवठ्याची चटणी 5 मिनिटांत तयार आहे.
PaniPuri Lovers इथं मिळतेय 'पिझ्झा चीज पाणीपुरी'; खवय्यांची असते तुफान गर्दी
तर घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यपासून कवठाची चटणी बनून तयार होते. एक कवठ आणि रोजचे मसाले म्हणजे तिखट, हळद, जिरे, मीठ गूळ आणि लसूण हे साहित्य वापरून अगदी 5 मिनिटांत ही चटणी बनवता येते. विदर्भात ही चटणी आवडीने खाल्ली जाते. तुम्हीसुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या कवठाची चटणी एकदा नक्की ट्राय करा.