या प्रदर्शनात भेटवस्तू, कपडे, दागिने, गृहसजावटीच्या वस्तूंसह विविध प्रकारच्या आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये जिथे पैठणी, कॉटन, लिनन, साउथ सिल्क, साड्यांचे स्टॉल खास आकर्षण ठरत आहेत. अशा विविध प्रकारच्या साड्या अगदी 650 रुपयांपासून 2000 पर्यंत उपलब्ध आहेत. याशिवाय, बिडाचे तवे 1000 रुपयांपासून, आणि पितळाची कलाकुसर केलेली भांडी 1200 रुपयांपासून विक्रीस ठेवली आहेत.
advertisement
प्रदर्शनात कॉटन, लिनन, खादी, बटिक यांसारखी ड्रेस मटेरियल 650 ते 1500 पर्यंत मिळत आहेत. 1 ग्रॅमची ज्वेलरीही खास आकर्षण ठरत असून त्यामध्ये नेकलेस, इअररिंग्स, ब्रेसलेट, रिंग्स आदींचा समावेश आहे. या दागिन्यांची किंमत 500 पासून सुरू होते.
कोकणातील हस्तकलेच्या वस्तूंना तसेच होम डेकॉरच्या वस्तू येथे विशेष स्थान आहे. हँडमेड वस्तूही 300 पासून ते 3000 पर्यंत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे सर्व स्टॉल देशभरातील विविध राज्यांतील आणि जिल्ह्यांतील उद्योजकांनी मांडलेले आहेत, ज्यामुळे एकाच ठिकाणी विविध संस्कृतींचा आणि कलेचा संगम अनुभवायला मिळतो आहे.