TRENDING:

Skin Care : चेहऱ्यावरच्या खड्ड्यांना औषध काय ? मुरुमांमुळे झालेले डाग कमी करण्यासाठी उपचार

Last Updated:

चेहरा नितळ, एकसमान दिसावा यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. त्यातलाच एक म्हणजे कोरफड, मध, खोबरेल तेल, डाळीचं पीठ आणि दुधाचा वापर तयार केलेली पेस्ट. पाहूया ही पेस्ट कशी तयार करायची आणि त्याचा काय उपयोग होतो. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : काहींच्या चेहऱ्यावरती कोणतेही डाग नसतात. काहींचा चेहरा खडबडीत, खरखरीत असतो. अनेकदा चेहऱ्यावर होणारे खड्डे मुरुमांमुळे होतात. त्वचेच्या ऊतींचं नुकसान होतं आणि कोलेजन योग्यरित्या तयार होत नाही, ज्यामुळे खड्डे तयार होतात.
News18
News18
advertisement

चेहरा नितळ, एकसमान दिसावा यासाठी अनेक उपाय उपलब्ध आहेत. त्यातलाच एक म्हणजे कोरफड, मध, खोबरेल तेल, डाळीचं पीठ आणि दुधाचा वापर तयार केलेली पेस्ट. पाहूया ही पेस्ट कशी तयार करायची आणि त्याचा काय उपयोग होतो.

Hair Care : या आयुर्वेदिक तेलानं टाळू होईल स्वच्छ, केस होतील दाट, वाचा सविस्तर

advertisement

पीलिंग आणि मायक्रोनीडलिंग सारखे वैद्यकीय उपचार उपलब्ध असतात, पण खड्डे खोल असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी, कोरफडीचा गर या खड्ड्यांवर लावा. यासाठी व्हिटॅमिन ई कॅप्सूलही वापरु शकता. मुरुम आणि त्याचे डाग कमी करण्यासाठी मध आणि दालचिनी पावडरची पेस्ट लावा.

नारळाचं तेल देखील फायदेशीर ठरू शकतं. यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते.

advertisement

बेसन, मध आणि दूध मिसळून पेस्ट चेहऱ्यावर लावा. ते सुकल्यानंतर धुवा. यामुळे छिद्रं घट्ट होतात आणि चेहऱ्यावरील डाग, खड्डे काही प्रमाणात कमी होऊ शकतात.

Deep Conditioning : खास हिवाळ्यासाठी नॅचरल हेअर कंडिशनर, जाणून घ्या कृती

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. यासाठी, व्हिटॅमिन सी असलेले स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, किवी आणि ब्रोकोलीसारखे पदार्थ खा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ख्रिसमससाठी आकर्षक कँडल्स, मिळतायत फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यात इथं करा खरेदी
सर्व पहा

ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिडसाठी सॅल्मन मासा, अक्रोड, जवस आणि सोयाबीन खा. बीन्ससारखे झिंकयुक्त पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. या सर्वांव्यतिरिक्त, दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणं महत्वाचं आहे, कारण पाणी त्वचेसाठी खूप महत्वाचा घटक आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहऱ्यावरच्या खड्ड्यांना औषध काय ? मुरुमांमुळे झालेले डाग कमी करण्यासाठी उपचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल