Hair Care : वीकेंडला केसांना द्या खास ट्रिटमेंट, आयुर्वेदिक तेलानं करा केसांना मसाज

Last Updated:

दाट आणि काळ्याभोर केसांसाठी आयुर्वेदिक तेल हा चांगला पर्याय आहे. आयुर्वेदिक तेलामुळे केस काळे, लांब आणि जाड होतील आणि केस गळणंही थांबवता येईल. या तेलांविषयी माहिती आणि उपयोगाविषयी जाणून घेऊया.

News18
News18
मुंबई : जाड आणि काळे, लांब, केस असावेत अशी अनेकांची इच्छा असते. पण, अनेकदा धावपळीत, वाढता ताण, प्रदूषण आणि आहारातले बदल यामुळे केसांचं आरोग्य बिघडत चाललंय.
दाट आणि काळ्याभोर केसांसाठी आयुर्वेदिक तेल हा चांगला पर्याय आहे. आयुर्वेदिक तेलामुळे केस काळे, लांब आणि जाड होतील आणि केस गळणंही थांबवता येईल. या तेलांविषयी माहिती आणि उपयोगाविषयी जाणून घेऊया.
भृंगराज तेल - भृंगराज तेल हे केस गळतीवर केला जाणारा जुना उपाय. केस गळती रोखणं आणि केसांच्या चांगल्या वाढीसाठी भृंगराज तेलाचा वापर घराघरांत शतकानुशतकं केला जातो आहे. या तेलाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा थेट टाळूवर परिणाम होतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि केसांच्या मुळांना पोषण देतं असं मानलं जातं. पण याचे परिणाम तात्काळ नसून हळूहळू होतात.
advertisement
तेल लावण्यासाठी, आधी थोडं तेल गरम करा आणि धुण्यापूर्वी ते टाळूवर पंधरा-वीस मिनिटं मालिश करा. आठवड्यातून दोनदा हे तेल लावू शकता.
नारळ तेल आणि आवळा - आवळ्याच्या तेलात नारळाचे तेल मिसळून लावल्यानं केसांची मुळं मजबूत होतात आणि केस निरोगी राहतात. प्रदूषण, ताणामुळे होणाऱ्या नुकसानाचे परिणाम देखील कमी होतात. आवळा तेल नारळाच्या तेलात मिसळून लावू शकता. केस धुण्यापूर्वी या तेलानं टाळूला मसाज करा आणि अर्धा तास तसंच राहू द्या. हे तेल नियमितपणे लावल्यानं त्याचे फायदे दिसून येतील.
advertisement
तीळ तेल आणि मेथीचे दाणे - तीळाच्या तेलामुळे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतं आणि मेथीच्या दाण्यांमधल्या भरपूर प्रथिनामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणं कमी होतं.
मेथीचे दाणे रात्रभर तिळाच्या तेलात भिजवा. दुसऱ्या दिवशी, ते थोडंंसं गरम करा, गाळून घ्या आणि टाळूवर मालिश करा. अर्ध्या तासानं केस व्यवस्थित धुवा.
advertisement
आवळा, रीठा आणि शिकाकाई - आवळ्यामुळे टाळूचं पोषण होतं, रीठ्यामुळे टाळू स्वच्छ राहतो आणि शिकाकाईनं केस कोरडे न होता कंडिशनिंग होतं. या तिन्ही घटकांमुळे तयार झालेलं तेल केसांच्या वाढीसाठी आणि टाळूच्या स्वच्छतेसाठी चांगला पर्याय ठरतं. हे तेल डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी खूप परिणामकारक आहे. यासाठी, तेल थोडंसं गरम करा, टाळूवर पंधरा-वीस मिनिटं मसाज करा आणि नंतर ते धुवा. आठवड्यातून एकदा हे तेल वापरू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hair Care : वीकेंडला केसांना द्या खास ट्रिटमेंट, आयुर्वेदिक तेलानं करा केसांना मसाज
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement