मनुका ज्याला काही जण बेदाणे असं सुद्धा म्हणतात. हे मनुके आरोग्यसाठी फायद्याचे मानले जातात. मनुक्यात कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स उत्तम प्रमाणात आढळून येतात. मनुके पाण्यात भिजवून खाल्ले तर ते आरोग्यासाठी आणखी फायद्याचे ठरतात असं आयुर्वेदात सांगितलं आहे. मात्र त्याच बरोबर मनुके भिजवलेल्या पाण्याचे औषधी गुणधर्मसुद्धा वाढतात.
हे सुद्धा वाचा :Raisin Health Benefits: काळा, पिवळा, हिरवा की लाल? आरोग्यासाठी कोणता मनुका फायदेशीर
advertisement
जाणून घेऊयात मनुक्याचं पाणी पिण्याचे फायदे
1) पचनास फायदेशीर:
मनुक्यात फायबर आणि अँटिऑक्सिडेंट असतात, जे पचनक्रिया सुधारतात. मनुके भिजवलेलं पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतं आणि आतडंही आतून स्वच्छ व्हायला मदत होते.
2) ॲनिमियावर गुणकारी:
मनुक्यात लोह उत्तम प्रमामात आढळून येतं. दररोज मुनके खाल्ल्याने आणि मनुका भिजवलेलं पाणी प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान त्रास होतो किंवा ज्यांना ॲनिमियाचा त्रास आहे अशा महिलांसाठी मनुक्याचं पाणी पिणं फायदेशीर आहे.
3) हृदयाचं आरोग्य सुधारतं:
मनुक्यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि भविष्यात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.
4) नैसर्गिक डिटॉक्सिफायर :
मनुक्याचं पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे. म्हणजेच हे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकायला मदत होते. मनुक्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि ‘व्हिटॅमिन सी’ त्वचेचा उजळपणा मिळतो. यामुळे सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्याही कमी होतात.
5) स्नायूंना बळकटी:
मनुक्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे घटक असतात, जे स्नायूंना मजबूत करण्यास आणि शरीरातील हाडे निरोगी ठेवण्यास मदत करतात.
मनुक्याचं पाणी कसं तयार करायचं ?
एका ग्लास पाण्यात 10-12 मनुके टाका. त्या ग्लासवर झाकण ठेवून ते रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावं.