Health Tips : काळे, पिवळे, लाल, हिरवे.. इतक्या रंगांचे असतात मनुके, पण कोणते जास्त फायदेशीर?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
मनुका हे असे ड्रायफ्रूट आहे, जे सर्व वयोगटातील लोकांना खायला आवडते. मनुके अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये चव आणि सजावटीसाठी वापरतात. मनुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मनुके खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो, हाडे मजबूत होतात आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. मात्र आपल्यासाठी नेमके कोणत्या रंगाचे मनुके जास्त फायदेशीर आहेत. चला जाणून घेऊया.
advertisement
advertisement
काळे मनुके : काळे मनुके हे अतिशय सामान्य मनुके आहेत. ते बाजारात सहज उपलब्ध असतात. हे काळ्या द्राक्षापासून तयार केले जाते. काळे मनुके हाडांसाठी फायदेशीर असतात आणि शरीराला ऊर्जाही देतात. काळ्या मनुक्यामध्ये फायबर, लोह पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. हे त्वचा, केस आणि पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर असतात.
advertisement
advertisement