ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खाणे किंवा बाहेरचे जेवण टाळले पाहिजे. त्याऐवजी स्वतःचा डबा घेऊन जाणे योग्य आहे. आपल्यापैकी बहुतेकजण ऑफिसला जाताना डबा घेऊन जाणे टाळतात. कारण बऱ्याचदा जेवण बनवायला खूप वेळ लागतो. पण निरोगी राहण्यासाठी घराचे जेवण महत्त्वाचे आहे. म्हणूनच व्यस्त कामाच्या दिवशीही तुम्ही दुपारच्या जेवणासाठी तयार करू शकता अशा काही झटपट आणि आरोग्यदायी रेसिपीज आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
advertisement
रोस्टेड स्वीट पोटॅटो आणि क्विनोआ सॅलड..
ही सोपी सॅलड रेसिपी पौष्टिक आहे. भाजलेले रताळे क्विनोआमध्ये मिसळा. यात उकडलेले ब्रोकोली आणि चणे सोबतच पालक, लाल कोबी आणि एव्होकाडो घाला. ताहिनी सॉस आणि लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करा. हे प्रोटीन, कार्ब्स, फायबर आणि हेल्दी फॅट्सने परिपूर्ण आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर पोट भरलेले वाटेल. भाज्या उकळायला फार कमी वेळ लागतो आणि तुम्ही भाजलेले रताळे आधीच तयार करून ठेवू शकता. क्विनोआ आधी तयार करून ३-४ दिवसांसाठी स्टोअर करून ठेवता येतो. सकाळी फक्त सर्व घटक एकत्र मिसळा.
चणा आणि पनीर सॅलड..
एका भांड्यात उकडलेले चणे, टोमॅटो, काकडी, गाजर आणि पनीरचे तुकडे घ्या. त्यात जिरे पावडर, लसूण पावडर, काळी मिरी आणि तुमच्या आवडीचे इतर मसाले घाला. ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस घालून सर्व एकत्र करा. हा एक चविष्ट आणि प्रोटीन-समृद्ध पदार्थ आहे, जो तुम्ही ब्रेडसोबत घेतल्यास झटपट लंच तयार होईल.
टोमॅटो शेवया..
जर तुम्हाला सॅलड आवडत नसेल, तर ही शेवयांची सोपी आणि झटपट रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी ट्राय करू शकता. यासाठी तुम्हाला शेवया, पिकलेले टोमॅटो, कांदे, हिरवी मिरची, आले, कढीपत्ता, मोहरी आणि हळद पावडर लागेल. तुम्ही चव वाढवण्यासाठी लिंबाचा रस घालू शकता. शिमला मिरची, गाजर आणि शेंगदाणे यांसारख्या भाज्या आणि काजू घालून हा पदार्थ अधिक पौष्टिक बनवू शकता. हा पदार्थ बनवायला आणि डब्यात घेऊन जायला खूप सोपा आहे. जेवणाच्या वेळी तुम्हाला फक्त एकदा गरम करावे लागेल आणि त्याचा आनंद घ्या.
या सोप्या रेसिपीज एकदा नक्की ट्राय करा. यामुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी निरोगी राहाल आणि तुमचा मेंदू शांत राहील. कामाच्या लांब आणि थकवणाऱ्या दिवसानंतर हलकीशी वॉक आणि व्यायामदेखील करावा. मात्र जेवण टाळू नका आणि शक्य तितके घरचेच अन्न खा.