अनेकांना सकाळी उठल्यावर पोटात जडपणा जाणवणं, गॅस होणं किंवा बद्धकोष्ठता होते. रात्री उशीरा जेवणं , बदलती जीवनशैली, पाणी कमी पिणं आणि नाश्त्याच्या चुकीच्या सवयी याला कारणीभूत ठरतात.
रात्रीच्या वेळी पचनसंस्था मंदावते आणि अन्न नीट पचलं नाही तर सकाळी पोट फुगणं आणि गॅसेसची समस्या जाणवते. म्हणूनच, सकाळी नाश्ता काय करता यावर आतड्यांचं आरोग्य अवलंबून असतं.
advertisement
Skin Care : चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आवश्यक टिप्स, नक्की वापरुन पाहा
तज्ज्ञांच्या मते, नाश्ता केवळ भूक भागवण्यासाठीच नाही तर पचनसंस्था सक्रिय आणि शांत ठेवण्यासाठी देखील आवश्यक आहे. नाश्त्यात योग्य घटकांचा समावेश असेल तर गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
सकाळी उठून सर्वात आधी एक ग्लास कोमट पाणी पिणं फायदेशीर मानलं जातं. यामुळे रात्रीचे डिहायड्रेशन भरून निघतं आणि पचनसंस्था सक्रिय होते. अनेक जण त्यात थोडं लिंबू देखील घालतात, ज्यामुळे थोडं हलकं वाटू शकतं आणि पोटफुगी कमी होते.
ओट्स किंवा दलिया - नाश्त्यात जड, तळलेले किंवा खूप मसालेदार पदार्थ असतील तर गॅसची समस्या वाढू शकते. ओट्स किंवा दलिया हा नाश्त्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो. यात फायबर असतं, याचं पचन हळूहळू होतं आणि पोट जास्त काळ पोट भरलेलं राहतं, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगी कमी होते.
फळं - नाश्त्यात हलकं काही हवं असेल तर केळी, सफरचंद किंवा पपई सारखी फळं खा. ही फळं पचायला सोपी असतात आणि याचा पोटावर ताण येत नाही. त्यातील फायबरमुळे पचन सुधारतं आणि गॅस निर्मिती कमी होते.
भिजवलेला सुका मेवा - सकाळी रिकाम्या पोटी सुका मेवा खाणं हा चांगला पर्याय आहे. यासाठी रात्रभर बदाम, मनुका किंवा अक्रोड भिजवून ठेवा. भिजवलेला सुका मेवा खाणं देखील पोटासाठी चांगलं मानलं जातं.
Hair Care : या आयुर्वेदिक तेलानं टाळू होईल स्वच्छ, केस होतील दाट, वाचा सविस्तर
यामुळे पचनाला मदत होते आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि पोटफुगी कमी होण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, दह्यासारखं प्रोबायोटिक अन्न आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांना संतुलित करण्यास मदत करतात.
नाश्त्यात मर्यादित प्रमाणात दही किंवा इडली, ढोकळा यांसारखे आंबवलेले पदार्थ असतील तर आतड्यांचं आरोग्य सुधारतं आणि गॅसची समस्या कमी होते.
सकाळी नारळ पाणी प्यायल्यानं शरीर हायड्रेट राहतं आणि पोट थंड होते. नारळ पाण्यामुळे गॅस आणि आम्लता कमी करण्यास मदत करते. आहारात कोणतेही बदल करण्याआधी आहारतज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
