TRENDING:

प्रवाशांसाठी गुड न्यूज! इंदूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस आता नागपूरपर्यंत धावणार; पाहा वेळापत्रक

Last Updated:

इंदूर- भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंतच्या प्रवासामूळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नागपूर, 9 ऑक्टोबर : वंदे भारत रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे बोर्डाने मोठी भेट दिली आहे. नागपूर-बिलासपुर वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता इंदूर- भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस आता महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपर्यंत प्रवास करेल असा निर्णय घेण्यात आला आहे. आज ( 9 ऑक्टोबर ) पासून या प्रवासाला प्रारंभ होत असुन सकाळी 6.30 वाजता इंदूरवरून ही रेल्वे सुरू झाली तर मंगळवार पासुन ही रेल्वे दररोज 6.10 मिनिटांनी रवाना होऊन दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास नागपूरला पोहचेल. या इंदूर- भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंतच्या प्रवासामूळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय प्रवाशांच्या वेळेची देखील बचत होणार आहे.
News18
News18
advertisement

इंदूर- भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंत प्रवास संदर्भात रेल्वे बोर्डाचे सहसंचालक ( कोचिंग ) विवेक कुमार सिन्हा यांनी पत्राद्वारे माहिती दिली. या पत्रानुसार रेल्वे बोर्डाने 20911/20912 इंदूर -भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस नागपूरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी याला दुजोरा दिला आहे. केवळ इंदूर -भोपाळ दरम्यान चालणारी या वंदे भारत एक्स्प्रेसची खर्च आणि वेळ बघता प्रवाश्यांची संख्या फार कमी होती. या रेल्वेचा नागपूर पर्यंत विस्तार केल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल असा अनुमान रेल्वे विभागाने लावला आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात असे लक्ष्यात आले होते की या गाडीच्या 70 टक्के हून अधिक सीट रिकाम्या राहत होत्या. त्यामुळे ही उणीव आणि प्रवाश्यांची मागणी लक्ष्यात घेता रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे.

advertisement

कोकण रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक, मनस्ताप टाळण्यासाठी वेळापत्रक पाहा

असे असेल वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक 

View More

इंदूर वरून सकाळी ही ट्रेन 6.10 वाजता नागपूरसाठी रवाना होईल. त्यानंतर सकाळी 7 वाजता उज्जैनला पोहोचेल. सकाळी 9. 15 मिनिटांनी भोपाल येथे पोहोचेल. तर सकाळी 10:45 ला इटारसी येथे पोहोचेल. आणि अखेर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी ही ट्रेन नागपूर येथे पोहोचेल.

advertisement

दिव्यांग खेळाडूंची विशेष कामगिरी, पाहा कशी झाली जलतरण स्पर्धा? Video

परतीचे वेळापत्रक 

नागपूरहून दुपारी 3.20 ही ट्रेन इंदूरसाठी रवाना होईल. संध्याकाळी 7 वाजता ती इटारसीला पोहोचेल. 8 वाजून 40 मिनिटांना ही ट्रेन भोपाळ येथे असेल. तर रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी ही ट्रेन उज्जैन येथे पोहोचेल आणि अखेर 11:45 मिनिटानी ही ट्रेन इंदूर येथे पोहोचेल अशी माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
प्रवाशांसाठी गुड न्यूज! इंदूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस आता नागपूरपर्यंत धावणार; पाहा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल