TRENDING:

मुंबईतील 400 वर्षांपूर्वीचं हेरिटेज गाव, घरांच्या भिंतीवर चक्क कलाकारांचे पेंटिंग, Video

Last Updated:

अँग्लो इंडियन पोर्तुगीज संस्कृतीच्या पाऊलखुणा या गावात असून चित्रपट कलाकारांच्या छायचित्रांनी रंगवलेल्या भिंती हे गावाचं वेगळेपण आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मयुरी सर्जेराव, प्रतिनीधी
advertisement

मुंबई: महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे एक ऐतिहासिक शहर आहे. याठिकाणी पूर्वीपासूनच विविध धर्म, जाती आणि संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. मुंबईतील बांद्रा येथे असंच एक 400 वर्षांपूर्वीचं गाव आहे. अनेकांना माहिती नसेल पण रनवार हे गाव वारसा स्थळ म्हणून ओळखळं जातं. हे गाव भारतीय कॅथलिक मूळ चोवीस पाखड्यांपैकी एक आहे. बांद्रा पश्चिम येथील वरोडा रोडपासून म्हणजे हिल रोडपासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर हे गाव वसलं आहे. विशेष म्हणजे अँग्लो इंडियन पोर्तुगीज संस्कृतीच्या पाऊलखुणा या गावात असून चित्रपट कलाकारांच्या छायचित्रांनी रंगवलेल्या भिंती हे येथील वेगळेपण आहे.

advertisement

रनवार गावाचा थोडक्यात इतिहास

ब्रिटीशांनी 1661 मध्ये पोर्तुगीज राजवटीतून मुंबई जिंकली. पण बांद्राला लागून असलेल्या 24 गावांपैकी एक असलेल्या रनवारचा संपूर्ण ताबा मिळवण्यात त्यांना अपयश आलं. कालांतराने, ब्रिटिशांनी ते ताब्यात घेतलंही पण तोपर्यंत, पोर्तुगीजांनी कॅथलिक आडनाव, कॅथेड्रल आणि खाद्यपदार्थांच्या संयोजनाद्वारे बांद्राच्या वारशावर छाप सोडली होती. रनवार गाव 1716 चे आहे आणि येथील अनेक इमारती किमान 100 वर्षे जुन्या आहेत. त्यांच्याकडे वैशिष्ट्यपूर्ण इंडो-पोर्तुगीज-अँग्लो वास्तुकला आहे. मोठ्या लाकडी पोर्चेस, आवर्त जिने आणि गॅबल्ड छप्पर असणारी घरं दिसतात. एकेकाळी हे भात उत्पादक गाव होतं. पण कालांतराने परिसरातील नवीन घडामोडींमुळे या गावाची नेमकी सीमा पुसट होत गेली.

advertisement

View More

एवढं स्वस्त कुठंच नाही, चक्क किलोवर मिळतायेत कपडे, चिंधी मार्केट माहितीये का? Video

घरांच्या भिंतीवर कलाकारांची चित्रे

दरम्यान, 2012 मध्ये, एक शहरी कला प्रकल्प जो लोकप्रिय हिंदी चित्रपटसृष्टीचा एक आदर्श आहे. रनवार येथे हा प्रकल्प नियोजित आणि कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत अनेक घरांच्या भिंतींवर जुन्या चित्रपटांमधल्या कलाकारांचे भले मोठे पेंटींग काढण्यात येतात आणि हे पेटिंग बदलण्यातही येतात. वहिदा रहमान, अमिताभ बच्चन, हेलनजी, तसेच आताच्या कलाकारांमधील इरफान खान त्याचसोबत अनेक कलाकारांचे चित्र आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारचे चित्र इथल्या भिंतींवर पाहायला मिळतात. रनवार गाव आणि त्याच्या आजू-बाजूचा परिसर हा रंगीत तर वाटतोच पण सोबतच एकेकाळी इथे पोर्तुगीजांचा वावर असल्याच्या पाऊलखुणाही इथल्या घरांकडे पाहून लक्षात येतात.

advertisement

मुंबईच्या रस्त्यावर धावतेय कपड्यांचे दुकान, पाहा कसा आहे क्लोथ ट्रक? Video

रनवार गावाची आताची परिस्थिती

आता मात्र हे गाव खूप बदललं आहे. पोर्तुगीज काळातील वास्तुकलेने आता अधिक शहरी स्वरूप धारण केले आहे. रनवारमधील लोकसंख्याही बदलली आहे, ज्यामुळे सामुदायिक जीवनाची जडणघडण झाली आहे. अरुंद गल्ल्या वाहतुकीला अडथळा ठरतात. काही घरांतील मूळ रहिवासी निघून जात आहेत आणि या शहरी गावाची लोकसंख्या झपाट्याने बदलत आहे. ही जुनी घरे संरचनात्मक समस्या अनुभवत आहेत.

advertisement

एकेकाळी सूर्यप्रकाश असलेली घरांची मोकळी जागा आता आजूबाजूला असलेल्या उंच उंच इमारतींनी व्यापलेली आहे. या असंख्य समस्यांमुळे जुन्या घरांची देखभाल करणे अवघड बनले आहे. त्यामुळे रनवार येथील 42 बंगल्यांपैकी 6 बंगले पाडण्यात आल्याचं देखील इथले रहिवाशी सांगतात. गावात आता सुमारे 2 हजार कुटुंबे राहत असल्याचं सांगितलं जातं.

गाव बदललं असलं तरीही काही प्रमाणात का होईना पण अजूनही काही घरांच्या माध्यमातून ती इंडो-पोर्तुगीज-अँग्लो वास्तुकला डोकावते आणि या घरांच्या भिंतींवर असलेले हिंदी कलाकारांचे मोठे पेंटींग गावाची एक नवीन ओळख करून देतात. तसेच या गावाचं सौंदर्य आणखी खुलवतात हे नक्की.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Travel/
मुंबईतील 400 वर्षांपूर्वीचं हेरिटेज गाव, घरांच्या भिंतीवर चक्क कलाकारांचे पेंटिंग, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल