हलाल हॉलिडे म्हणजे काय?
इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्या मंडळींसाठी 'हलाल' हा महत्त्वाचा शब्द आहे. धार्मिक परंपरांशी तडजोड न करता सुट्टी साजरी करणे म्हणजे हलाल टुरिझम. हॉटेल, रिसॉर्ट, मुख्यतः अशा ठिकाणी जिथे स्विमिंग पूल अथवा अन्य मनोरंजनाची ठिकाण आहेत त्या ठिकाणी मुस्लिम महिलांच्यी सोयीचा विचार केला जातो. लक्षात ठेवता. त्या महिलांच्या पेहरावला लक्षात ठेवता त्यांच्यासाठी एका विशिष्ट प्रकारे व्यवस्था असते. त्या ठिकाणी फक्त महिलांनाच प्रवेश मिळतो. कोणत्याही पुरुषांना परवानगी नसते.
advertisement
रेल्वे अपघातातील मृतदेह उचलतं कोण? 'या' महिलांच्या कामगिरीला कराल सलाम
इस्लाम धर्मात मद्य हे हराम असून त्या ठिकाणी मुस्लिम जाणं शक्यतो टाळतात. त्यामुळे हलाल टुरिझममध्ये ज्या ठिकाणी मद्य विक्री होत नाही, त्या हॉटेलला पसंती दिली जाते, अशी माहिती अलवी यांनी दिली.
महिलांनो, ‘या’ लक्षणांकडं करु नका दुर्लक्ष, ब्रेस्ट कॅन्सरचा असू शकतो धोका!
इस्लाममध्ये नॉनव्हेज हे धार्मिक नियमानुसार हलाल केलेलं ग्रहण करावं. हलाल केलेलं अन्न मिळत नाही त्या ठिकाणी मुस्लिम शक्यतो नॉनव्हेज खाणे टाळतात. त्यामुळे जिथं हलाल फुड मिळतं अशाच ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाते.
भारतात हे टुरिझम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू नसलं तरी परदेशात याची मागणी वाढतीय. विशेषत: आखाती देश आणि युरोपात याला मोठी पसंती मिळतीय. या टुरिझमचा मुस्लीम महिलांना फायदा होत असल्यानं त्यांची मोठी पसंती मिळतीय. येत्या काळात यामध्ये आणखी उलाढाल वाढेल असं मत इमरान अलवी यांनी व्यक्त केलं.