तुम्ही घरातून परफ्युम लावून निघाला असाल तरी कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्याचा सुगंध टिकत नाही. उन्हाळ्यात परफ्युमचा सुगंध जास्त काळ टिकावा असं तुम्हाला वाटत असेल तर परफ्युम नेमका कसा लावावा, याबद्दल ख्रिश्चन डायर परफ्युम्सचे ट्रेनिंग मॅनेजर नेव्हिन थिएरमन यांनी काही टिप्स दिल्या आहेत. ज्या उन्हाळ्यात तुम्हाला मदत करू शकतात.
उन्हाळ्यात थंडी बिअर प्यायल्याने खरंच पोटाची चरबी वाढते का? पाहा तज्ज्ञांचे मत
advertisement
सुगंध असावी आवड
परफ्युममुळे खूप जणांना डोकं दुखण्याचा त्रास होतो. परफ्युममुळे होणारी डोकेदुखी होऊ नये, यासाठी पर्याय म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी योग्य सुगंध असलेला परफ्युम निवडणं होय. त्यामुळे वेगवेगळा सुगध येणारे परफ्युम वापरून पहा, ही पद्धतही काम करत नसेल तर मग सुगंधित बॉडी प्रॉडक्ट वापरून पाहा. जर कुणाला परफ्युम वापरायचा नसेल तर ते गुलाब व नेरोली यांसारखे सुगंधी कंपाउंड असलेले साबण किंवा बॉडी शॉप देखील वापरू शकता, असा सल्ला थिएरमन देतात.
लेअरिंग करा
मॉईश्चराइज्ड त्वचेवरील सुगंध जास्त काळ टिकून राहतो. दिवसभर परफ्युमचा चांगला सुगंध यावा, यासाठी थिएरमन परफ्युमच्या एकापेक्षा जास्त लेयर लावण्याचा सल्ला देतात. तुम्ही फक्त परफ्युम केलेले बॉडी लोशन वापरत असाल तर तुम्हाला खूप कमी सुगंध येईल. पण जर तुम्ही सुगंधित साबण, क्रीम आणि नंतर परफ्युम लावल्यास तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा सुगंध मिळेल.
योग्य पद्धतीने लावा
तुमच्या शरीराच्या उष्ण भागांवर परफ्युम लावल्याने सुगंध सहज पसरतो. त्यामुळे तुम्ही मान, मनगट, गुडघ्यांच्या मागे आणि कानाच्या पाळ्यांवर परफ्युम लावावा. अंगावर परफ्युम लावल्यानंतर कपड्यांवरही परफ्युम लावा.
साखरेचा पुरुषांच्या या महत्त्वाच्या हार्मोनवर होतो परिणाम; आरोग्यासाठी ठरू शकते घातक
परफ्युमची बाटली नीट ठेवा
जर तुम्ही तुमच्या महागड्या परफ्युमच्या बाटल्या बाथरूमच्या कॅबिनेटमध्ये ठेवत असाल तर तुमची पद्धत चुकीची असू शकते, कारण ओलावा परफ्युमची रचना नष्ट करू शकतो, त्यामुळे बाटल्या उष्णतेपासून दूर थंड कॅबिनेटमध्ये ठेवा.