Men's Health : साखरेचा पुरुषांच्या या महत्त्वाच्या हार्मोनवर होतो परिणाम; आरोग्यासाठी ठरू शकते घातक
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आज आपण साखरेचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा आणि किती परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती देत आहोत. साखर तशी महिला आणि पुरुष सर्वांच्याच आरोग्यासाठी हानिकारक असते. परंतु ती पुरुषांचे जास्त नुकसान करू शकते. चला पाहूया कसे..
मुंबई : महिलांच्या आरोग्यावर आणि त्यांच्या समस्यांवर बऱ्यापैकी बोलले जाते. मात्र पुरुषांच्या समस्या फारशा बोलल्या जात नाहीत. आज आपण साखरेचा पुरुषांच्या आरोग्यावर कसा आणि किती परिणाम होऊ शकतो याबद्दल माहिती देत आहोत. साखर तशी महिला आणि पुरुष सर्वांच्याच आरोग्यासाठी हानिकारक असते. परंतु ती पुरुषांचे जास्त नुकसान करू शकते. चला पाहूया कसे..
जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह आणि किडनीच्या आजाराचा धोका वाढतो, हे सर्वांना ठाऊक आहेच. मात्र, साखर खाल्य्याने ती तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करते, हे शक्य आहे का? सोशल मीडियावर असाच दावा केला जात आहे की, जर तुम्ही 75 ग्रॅम साखर खाल्ले तर शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी दोन तासांत 25 टक्क्यांनी कमी होईल. टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुषांच्या पुरुषत्वाला आकार देतो. हे खरे आहे की, पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्याने अनेक समस्या वाढू शकतात. पण शुगर टेस्टोस्टेरॉन कमी करते या विधानात कितपत तथ्य आहे?
advertisement
टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे कार्य काय?
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत, स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ सांगतात की, टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वाचे हार्मोन आहे. हे पुरुषांमधील पुनरुत्पादक अवयवांच्या पेशींच्या विकासामध्ये भाग घेते आणि स्नायूंचे प्रमाण वाढवते. याशिवाय, हाडांच्या मजबूतीसाठी आणि हाडांच्या घनतेसाठीही टेस्टोस्टेरॉन खूप महत्वाचे आहे. टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास हाडांमध्ये तीव्र कमकुवतपणा येऊ शकतो. रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या डॉ. भावना बंगा यांनी सांगितले की, टेस्टोस्टेरॉन हार्मोनमध्ये काही घट झाल्यास त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. पण आता खरंच साखर दोन तास टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी करते का, असा प्रश्न पडतो.
advertisement
75 ग्रॅम साखर 25 टक्के कमी करते..
याचे अनेक पुरावे असल्याचे डॉ. बंगा यांनी सांगितले. याचा परिणाम टेस्टोस्टेरॉन हार्मोनवरही होतो. परंतु ते केवळ टेस्टोस्टेरॉन संप्रेरक कमी करेल की दोन तासांसाठी टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी 25 टक्क्यांनी कमी करेल हे सांगणे अवघड आहे. कारण यावर अजून संशोधनाची गरज आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा आपण जास्त साखर खातो तेव्हा त्याचा सर्व प्रकारच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. खरं तर, जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्राइनोलॉजीमध्ये 2016 च्या संशोधनात असे आढळले की, 75 ग्रॅम साखर खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोन दोन तास कमी होतो. मात्र, या अभ्यासात केवळ 74 पुरुषांचा समावेश होता. त्यामुळे यावर अधिक संशोधन करण्याची गरज आहे.
advertisement
जास्त साखर खाण्याचे तोटे..
डॉक्टरांच्या मते, जेव्हा तुम्ही जास्त साखर खाता तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो. जास्त साखर खाल्ल्याने जास्त कॅलरीज तयार होतील, ज्या खर्च केल्या नाहीत तर फॅटमध्ये रुपांतरित होतील आणि ही फॅट फॅटच्या रूपात शरीरात जमा होऊ लागते. जेव्हा शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते तेव्हा ते टेस्टोस्टेरॉनची पातळी देखील कमी करते. इतकेच नाही तर जास्त साखर शरीरात जळजळ वाढवते. याचा परिणाम हार्मोन्सवरही होतो.
advertisement
त्याच वेळी, जास्त साखरेचा वापर लेप्टिन हार्मोनचा प्रतिकार करेल. लेप्टिन हार्मोन भूक आणि चयापचय प्रभावित करते. याचा अर्थ मेटाबॉलिज्मवरही परिणाम होईल. अशा स्थितीत टेस्टोस्टेरॉनवर अतिरिक्त साखरेचा परिणाम होऊ शकतो किंवा होणार नाही, पण त्यामुळे शरीराच्या अनेक यंत्रणांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे जास्त साखर न खाणेच चांगले. कारण साखर कोणत्याही प्रकारे आरोग्यासाठी चांगली नाही.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 29, 2024 9:29 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Men's Health : साखरेचा पुरुषांच्या या महत्त्वाच्या हार्मोनवर होतो परिणाम; आरोग्यासाठी ठरू शकते घातक