तुळशीमुळे रक्त शुद्ध होतं आणि डाग आणि मुरुम कमी होतात. भारत सरकारच्या आयुष मंत्रालय आणि राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेच्या मते, तुळस म्हणजे त्वचेसाठी घरातलंच ब्युटी पार्लर आहे. तुळशीमुळे, मुरुम आणि चेहऱ्यावरचे डाग काढून टाकण्यास मदत होते, त्वचेचा रंग सुधारतो. तुळशीचे अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार राहायला मदत होते.
advertisement
तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे -
तज्ज्ञांच्या मते, तुळशीचे पाणी प्यायल्यानं रक्त शुद्ध होतं, ज्यामुळे मुरुम कमी होतात आणि नवीन डाग तयार होत नाहीत.
Teeth Care : दातांच्या समस्यांवर उत्तम उपाय, वज्रदंतीचं फूल करेल जादू
दररोज तुळशीची पानं खाल्ल्यानं त्वचेचा अंतर्गत संसर्ग कमी होतो आणि चेहऱ्यावर चमक येते. महागड्या क्रीम आणि उपचारांची जागी तुळशीची पानं वापरुन पाहा. तसंच नैसर्गिक असल्यानं याचे कोणतेही दुष्परिणामही नाहीत.
राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेनं तुळशीच्या औषधी गुणधर्मांचं महत्त्व सांगितलं आहे.
तज्ञांच्या मते, त्वचेसाठी तुळस वापरण्याचे काही सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत: तुळशीच्या फेस पॅकसाठी, तुळशीची ताजी आठ-दहा पानं बारीक करा आणि त्यांना मुलतानी माती किंवा मधात मिसळा. ही पेस्ट पंधरा-वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर ती धुवा. यामुळे मुरुमं दूर होतात, डाग कमी होतात आणि त्वचा तेलकट होण्याचं प्रमाण कमी होतं. आठवड्यातून दोन-तीन वेळा याचा वापर करा.
तुळशीचं पाणी - तुळशीचं पाणी देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी, तुळशीची पाच-सात पानं रात्रभर स्वच्छ पाण्यात भिजवा. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यानं विषारी पदार्थ बाहेर पडतात, रक्त शुद्ध होतं आणि त्वचा उजळते. मुरुमांवर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
तुळशी चहा - तुळशीचा चहा केवळ चवीलाच चविष्ट नसतो, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील असतात. चहा बनवण्यासाठी तुळशीची चार-पाच पानं पाण्यात उकळा. त्यात लिंबू किंवा मध घालून प्यायल्यानं ताण कमी होण्यास आणि त्वचेची चमक वाढण्यास मदत होते.
Fruits : फळांमुळे खुलेल चेहऱ्याचं सौंदर्य, जाणून घ्या कोणती फळं त्वचेसाठी उत्तम
ताणतणावामुळे होणाऱ्या मुरुमांवर याचा विशेष परिणाम होतो. कच्ची तुळशीची पानं चावणं देखील फायदेशीर आहे. सकाळी तुळशीची दोन-तीन ताजी पानं चावल्यानं फ्रेश वाटतं आणि त्वचेचं संसर्गापासून रक्षण होतं.
तुळशीच्या नियमित वापरानं त्वचा निरोगी राहते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही देखील मजबूत राहते. हा एक स्वस्त, नैसर्गिक आणि सहजरित्या उपलब्ध होणारा उपाय आहे.
मुरुमं किंवा डाग गंभीर असतील तर तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारस करतात. यासोबतच, चांगली स्वच्छता राखणं, संतुलित आहार घेणं आणि भरपूर पाणी पिण्यानं त्वचेची चमक अनेक पटींनी वाढवू शकते.
