मॉर्निंग स्टिफनेसची कारणे आणि उपाय
काय आहे हा आजार?
मॉर्निंग स्टिफनेस हा कोणताही स्वतंत्र रोग नसून, अनेकदा हा संधिवातासारख्या आजारांचे लक्षण असतो. रात्री झोपल्यावर सांधे स्थिर राहतात, ज्यामुळे त्यांच्यातील रक्तप्रवाह आणि लवचिकता कमी होते. सकाळी उठल्यावर याच कारणामुळे शरीर आखडते.
प्रमुख कारणे
मॉर्निंग स्टिफनेसचे सर्वात मोठे कारण संधिवात आहे. या आजारात सांध्यामध्ये सूज येते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर जास्त आखडल्यासारखे वाटते. याशिवाय, जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे यामुळेही हे होऊ शकते.
advertisement
लक्षणे ओळखा
जर सांध्यांची ही जडता 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ टिकत असेल, सांध्यांना सूज आली असेल किंवा हालचाल करताना वेदना होत असेल, तर हे चिंतेचे कारण असू शकते.
गरम पाण्याचा शेक आणि अंघोळ
सकाळी उठल्यावर गरम पाण्याने अंघोळ करणे किंवा गरम पाण्याचा शेक घेतल्याने स्नायू शिथिल होतात आणि सांध्यांतील आखडलेपण कमी होते. यामुळे रक्ताभिसरण सुद्धा सुधारते.
हलका व्यायाम
रोज सकाळी उठल्यावर हलका व्यायाम आणि सांध्यांना लवचिक बनवणारे स्ट्रेचिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे सांधे लवचिक राहतात आणि स्नायू मजबूत होतात.
डॉक्टरांचा सल्ला
जर ही समस्या अनेक दिवसांपासून असेल आणि सोबत सूज किंवा वेदना होत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. यामागील मूळ कारण शोधून योग्य उपचार करणे आवश्यक आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)