चुकीचा आहार
आजची तरुण पिढी जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न, लाल मांस, आणि साखरेचे पदार्थ खात आहेत. या पदार्थांमध्ये फायबर खूप कमी असते. फायबरच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि आतड्यांमध्ये जळजळ वाढते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.
बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणा
कामामुळे किंवा मनोरंजनासाठी जास्त वेळ बसून राहणे आणि व्यायामाचा अभाव हे लठ्ठपणाचे प्रमुख कारण आहे. लठ्ठपणा हा अनेक प्रकारच्या कर्करोगासाठी एक प्रमुख धोक्याचा घटक मानला जातो.
advertisement
धूम्रपान आणि मद्यपान
धूम्रपान आणि जास्त प्रमाणात मद्यपान करणे केवळ लिव्हर आणि फुफ्फुसांच्या कर्करोगासाठीच नाही, तर आतड्यांच्या कर्करोगासाठीही जबाबदार आहे. ही सवयी आतड्यांच्या पेशींचे नुकसान करतात.
अनुवांशिक कारणे
काहीवेळा कोलन कॅन्सर अनुवांशिक कारणांमुळेही होतो. जर तुमच्या कुटुंबात कोणाला कोलन कॅन्सर झाला असेल, तर तुम्हालाही तो होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत लवकर तपासणी करणे आवश्यक आहे.
बॅक्टेरियातील बदल
आपल्या आतड्यांमध्ये असलेल्या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियाच्या संतुलनात बिघाड झाल्यानेही आतड्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. चुकीच्या आहारामुळे हे संतुलन बिघडते.
जागरूकता आणि तपासणी
तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष दिले पाहिजे. पोटदुखी, शौचास त्रास होणे, शौचात रक्त येणे किंवा अचानक वजन कमी होणे ही काही प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासणी करा. तरुणांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून आणि आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून कोलन कॅन्सरचा धोका कमी करणे शक्य आहे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)