हिना रोज नर्सरीचे मालक अल्ताफ मिर्झा हे गेल्या अनेक वर्षांपासून झाडांची शेती करत आहेत. त्यांनी नर्सरीमध्ये शेकडो प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी सांगितले की इतर नर्सरीमध्ये जी झाडे 500 रुपये किंमतीला मिळतात तीच झाडे त्यांच्या नर्सरीत 250 ते 300 रुपयांपर्यंत सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी खर्चात अधिक झाडे खरेदी करण्याची संधी येथे ग्राहकांना मिळते.
advertisement
'हे' झाड संजीवनी बुटीपेक्षा कमी नाही! अनेक रोगांवर गुणकारी, फायदे ऐकाल तर चकित व्हाल
या नर्सरीत तुम्हाला गुलाब, मोगरा, जाई, जुईसारखी फुलझाडे तर मिळतीलच, पण सोबतच सिताफळ, आवळा, लिंबू, पेरू, संत्रा, चिकू, आंबा यासारखी फळझाडेही उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शोभिवंत आणि छायादायक झाडांमध्ये अशोक, कडुनिंब, फायकस, बॉटल पाम, अरेका पाम, क्रोटन यांसारख्या वनस्पतींचाही समावेश आहे.
ग्राहकांसाठी ही नर्सरी एक पर्वणीच ठरली आहे. कमी दरात उत्तम प्रतीची झाडे मिळाल्यामुळे माजलगावसह बीड जिल्ह्यातून अनेक लोक येथे खरेदीसाठी येतात. विवाह सोहळा, घरगुती कार्यक्रम किंवा गिफ्टसाठी झाडे खरेदी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे.





