सदर ठिकाणी पोंचो फक्त 40 रुपयांपासून मिळत असून 100 रुपयांपर्यंत त्याचे दर आहेत. तीन ते चार वर्षांच्या लहान मुलांसाठी आकर्षक आणि टिकाऊ रेनकोट्स केवळ 150 रुपयांपासून उपलब्ध असून ते 250 रुपयांपर्यंत जातात. मोठ्यांसाठीच्या जॅकेट्सची किंमत 300 रुपयांपासून सुरू होते आणि 1000 रुपयांपर्यंत जाते. विशेष म्हणजे झिल या ब्रँडच्या जॅकेट्सवर सध्या 15 टक्के सूट दिली जात आहे.
advertisement
ज्यांच्याकडे जॅकेट आधीपासून आहे आणि फक्त पँटची गरज आहे, अशांसाठी वेगळ्या पँट्सही येथे विक्रीस उपलब्ध असून त्यांची किंमत 250 रुपयांपासून सुरू होते. चार वर्षांच्या मुलांसाठी खास रेनकोट्स केवळ 160 रुपयांपासून मिळत आहेत.
या दुकानातील सर्व रेनकोट्स आणि जॅकेट्स प्रीमियम दर्जाच्या साहित्यापासून तयार करण्यात आले असून, पावसात संपूर्ण संरक्षण देणारे व स्टायलिश असल्यामुळे ग्राहकांमध्ये यांना मोठी मागणी आहे. व्यापाऱ्यांसाठीही ही एक मोठी संधी असून होलसेल दरात थेट खरेदी करता येते. अल कादिर कलेक्शन हे दुकानाचं नाव आहे जे मस्जिद बंदर येथील चकाला येथे आहे.





