महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी 'आवडेल तेथे प्रवास' ही सवलत योजना प्रशासनाकडून राबवली जाते. या योजनेअंतर्गत 7 दिवस आणि 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार आंतरराज्यात प्रवास सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या योजने अंतर्गत येणाऱ्या बससेवांचे दर वाढवण्यात आले आहेत. दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारीत दर, अटी व शर्ती लागू करण्यसाठी मंजुरी देण्यात आली आहे. हे दर ३१ जानेवारीपासून अंमलात आणण्यात आले आहेत.
advertisement
नव्या दरानुसार आता साध्या बससाठी चार दिवसांसाठी 1814 तर सात दिवसांसाठी 3171 रुपये मोजावे लागणार आहेत. या निर्णयामुळे प्रवाशांमधून मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. किमान 'आवडेल तेथे प्रवास' या सवलत योजनेचे दर कमी ठेवले पाहिजेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. या योजनेचा सर्वाधिक लाभ विविध तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घेण्यासाठी वृद्ध नागरिक तसेच अनेक परिवार घेत असतात. या योजनेचा लाभ घेत अनेक नागरिक आपल्या परिवारासह राज्यासह इतर राज्यातील देव दर्शनाला जात असतात. या सवलत योजनेचा लाभ सुट्यांमध्ये फिरण्यासाठी देखील अनेक परिवार घेत असतात. त्यामुळे 'आवडेल तेथे प्रवास' या सवलत योजनेचे दर किमान करावेत, अशी मागणी आता होत आहे.
आवडेल तेथे प्रवास योजनेचे पासचे नवीन दर
सेवेचा प्रकार (4 दिवसांचे दर)
साधी, रातराणी : प्रौढ 1814, मुले 910
शिवशाही : प्रौढ 2533, मुले 1269
(7 दिवसांचे दर)
साधी, रातराणी : प्रौढ 3171, मुले 1588
शिवशाही : प्रौढ 4429, मुले 2217