राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी संभाजी होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी नियुक्ती केली. होळकर यांच्या खांद्यावर बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याची जबाबदारी देण्यात आल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
संभाजी नाना होळकर-पुणे जिल्ह्याचा पक्षाचा कारभारी
संभाजी होळकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असून आपणावर बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांची जबाबदारी देण्यात येत आहे. तरी पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा, असे प्रसिद्धीपत्रकात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. होळकर हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे जिल्ह्याचे कारभारीपद देण्याचे अजित पवार यांनी ठरवले.
advertisement
कोण आहेत संभाजी होळकर?
संभाजी नाना होळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती तालुक्याची जबाबदारी होती
संभाजी होळकर हे राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत होते
गेल्या २० ते २५ वर्षांपासून होळकर अजित पवार यांच्यासोबत काम करतात
विशेष म्हणजे पक्षफुटीच्या कठीण काळातही त्यांनी अजित पवार यांची साथ निभावली
प्रदीप गारटकर पक्षात असताना त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी होते
परंतु ते पक्षातून गेल्यानंतर होळकर यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
