ओल्या पावट्याचा मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ, तेल, ओला पावटा, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, स्टार फूल, जिरे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, गरम मसाला, गोडा मसाला, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे साहित्य लागेल.
Shengole Recipe: गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा चटपटीत शेंगोळे,एकदम टेस्टी!
advertisement
मसाले भात कृती
सुरुवातीला तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्ण निथळून घ्या. हा भात गावरान पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे पातेल्याचा वापर करायचा आहे. पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे वगळता उर्वरित खडा मसाला परतावा. मसाल्याला सुगंध आला की कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतावे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घालून काही वेळ शिजवावा. यानंतर स्वच्छ धुतलेले ओल्या पावट्याचे दाणे घालून थोडावेळ परतावेत, जेणेकरून त्यातील कच्चेपणा निघून जाईल. त्यात धुतलेला तांदूळ घालून सर्व साहित्य नीट मिसळावे. गॅस मध्यम आचेवर ठेवून तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालावे. त्यात हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर घालावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा ओला नारळ घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर भात शिजू द्यावा. भात शिजल्यावर काही वेळ झाकून ठेवून वरून ओला नारळ आणि कोथिंबीर घालून पावटा मसाले भात सर्व्ह करावा.





