पावट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक मसाले भात, रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ओल्या पावट्याच्या शेंगा हिवाळ्यातच मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते.
पुणे : काही भाज्या या ठराविक सिझनमध्ये मिळणाऱ्या असतात. त्यापैकी एक म्हणजे पावटा. ओल्या पावट्याच्या शेंगा हिवाळ्यातच मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पावट्याची सुकी किंवा रस्सा भाजी आपण नेहमी करतो, मात्र रोजच्या जेवणात बदल म्हणून आज आपण गावरान पद्धतीने बनवलेला ओल्या पावट्याचा चविष्ट मसाले भात बनवणार आहोत. आपल्याला ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे .
ओल्या पावट्याचा मसाले भात बनवण्यासाठी लागणारं साहित्य
तांदूळ, तेल, ओला पावटा, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, स्टार फूल, जिरे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, गरम मसाला, गोडा मसाला, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ हे साहित्य लागेल.
advertisement
मसाले भात कृती
सुरुवातीला तांदूळ स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्ण निथळून घ्या. हा भात गावरान पद्धतीने बनवणार आहोत. त्यामुळे पातेल्याचा वापर करायचा आहे. पातेल्यात तेल गरम करून त्यात जिरे वगळता उर्वरित खडा मसाला परतावा. मसाल्याला सुगंध आला की कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची घालून परतावे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
advertisement
कांदा भाजल्यानंतर टोमॅटो घालून काही वेळ शिजवावा. यानंतर स्वच्छ धुतलेले ओल्या पावट्याचे दाणे घालून थोडावेळ परतावेत, जेणेकरून त्यातील कच्चेपणा निघून जाईल. त्यात धुतलेला तांदूळ घालून सर्व साहित्य नीट मिसळावे. गॅस मध्यम आचेवर ठेवून तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालावे. त्यात हळद, चवीनुसार मीठ, गरम मसाला, गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर घालावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा ओला नारळ घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर भात शिजू द्यावा. भात शिजल्यावर काही वेळ झाकून ठेवून वरून ओला नारळ आणि कोथिंबीर घालून पावटा मसाले भात सर्व्ह करावा.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 5:20 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
पावट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय? मग गावरान पद्धतीने बनवा पौष्टिक मसाले भात, रेसिपीचा Video







