काय होतं ट्विट?
या अपघाताच्या वृत्ताच्या काही वेळ आधी अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) एक पोस्ट शेअर केल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांनी त्यांनी महान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘पंजाब केसरी’ म्हणून ओळखले जाणारे लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले होते. “राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे, महान स्वातंत्र्य सेनानी, स्वराज्याचे उद्घोषक ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची राष्ट्रनिष्ठा सदैव प्रेरणा देत राहील,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले होते.
advertisement
अजित पवारांच्या विमानात कोण कोण होतं?
या विमानात एकूण अजित पवारांसह पाच प्रवाशी होते. अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ एचसी विदीप जाधव विमानात उपस्थित होते. तर पायलट कॅप्टन सुमित कपूर यांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच कॅप्टन संभवी पाठक यांचा देखील मृत्यू झाला आहे. फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांना देखील जीव वाचवता आला नाही.
बारामतीतील रुग्णालयात मोठा जणसमुह पहायला मिळाला. अजित पवार यांच्या समर्थकांना अश्रू अनावर झाले. तर अनेक मोठे नेते रुग्णालयात दाखल होत आहे. सुप्रिया सुळे देखील दिल्लीवरून रवाना झाल्या आहेत. अजित पवार यांचे खंदे समर्थक समजले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांना अश्रू अनावर झाले. रडता रडता ते गाडीतून बारामतीला रवाना झाले आहेत.
